तोतया आयकर अधिकार्‍यांना ७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी

06 Mar 2026 17:44:19
वर्धा,
Fake income tax officer तोतया आयकर अधिकारी बनून एका माजी प्राध्यापकाच्या घरी छापा टाकण्याचा बनाव करणार्‍या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता तिघांनाही ७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शयता व्यत केली जात आहे.
 

Fake income tax officer 
श्रीनिवास कॉलनी येथील माजी प्राध्यापक चिंतामण कोंगरे यांच्या घरी दोन युवक आयकर अधिकारी असल्याचे सांगून पोहोचले होते. मात्र, कोंगरे यांचे पुत्र सुहास कोंगरे यांच्या सतर्कतेमुळे या दोघांचा बनाव उघडकीस आला. पोलिसांनी चौकशीदरम्यान त्यांच्या तिसर्‍या साथीदारालाही अटक केली. आरोपींमध्ये बोरगाव मेघे येथील किसन परबत (२५), यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुयातील कोहळा येथील चेतन चव्हाण (२९) आणि नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुयातील वाघुळा येथील अभिषेक विश्वकर्मा (२४) यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, चेतनने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले असून अभिषेक चालक म्हणून काम करतो. तर किसन शिक्षण घेत असताना शेअर मार्केटचे काम करत असल्याची माहिती आहे.
या तिघांनीही कमी वेळेत जास्त पैसे कमावण्याच्या उद्देशाने बनावट आयकर अधिकारी बनून छापा टाकण्याचा प्रयत्न केला. कारवाईची धमकी देत पैसे उकळण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, त्यांचा बनाव उघडकीस आला. या प्रकरणात आणखी काही साथीदार सहभागी असल्याची शयता पोलिसांनी व्यत केली असून पुढील तपास रामनगर पोलिस करत आहेत.
Powered By Sangraha 9.0