चक्क एटीएमव्दारे चालविल्या बनावट नाेटा; दाेन व्यापारी बंधूंना अटक

06 Mar 2026 22:02:11
अनिल कांबळे,
नागपूर,
fake-notes-being-circulated-through-atms : शहरात बनावट नाेटा चालविणारी टाेळी सक्रिय असून आतापर्यंत लाखाेंच्या बनावट नाेटा चलनात आल्याचे समाेर आले आहे. आत चक्क बनावट नाेटा एटीएमच्या माध्यमातून चलनात आणण्याचा धक्कादायक प्रकार नवीन कामठी परिसरात उघडकीस आला आहे. 500 रुपये दराच्या 38 बनावट नाेटा एटीएममध्ये जमा करून, त्या चलनात आणण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी कामठी येथील दाेन व्यापारी बंधूंना अटक करण्यात आली आहे.यामुळे व्यापारी वतुर्ळात एकच खळबळ उडाली असून,पाेलिस या रँकेटचा शाेध घेत आहे. अश्विन रविशंकर यादव व अरुण रविशंकर यादव अशी अटकेतील आराेपींची नावे आहेत. आराेपींचे कामठीतील गरुडचाैकात किराणा दुकान आहे.
 
 
j
 
पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 31 जुलै 2025 राेजी या दाेन्ही आराेपींनी कामठी-नागपूर मार्गावरील गरुड चाैक येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीनमध्ये 500 रुपयांच्या 38 संशयास्पद नाेटा जमा केल्या हाेत्या. या नाेटांची एकूण किमंत 19 हजार रुपये आहे. आराेपी त्यांच्या व्यवसायातून मिळणारी राेजची राेकड याच एटीएममध्ये जमा करत असल्याने त्यांच्या व्यवहारांची सीसीटीव्ही कॅमेèयांमध्ये नियमित नाेंद हाेत हाेती. दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गरुड चाैक शाखेतील एटीएममध्ये 500 रुपयांच्या 38 बनावट नाेटा आढळल्यानंतर शाखा व्यवस्थापक अमाेल सूर्यकांत राऊत यांनी 30 ऑगस्ट 2025 राेजी नवीन कामठी पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केली हाेती. त्यानंतर बँकेने सर्व नाेटा जप्त करून तपासासाठी नाशिक येथील इंडियन सिक्युरिटी प्रेसच्या प्रयाेगशाळेत पाठविल्या .
 
 
सीसीटीव्हीमुळे आला प्रकार उजेडात
 
 
6फेब्रुवारी 2026 राेजी नाशिक येथून प्राप्त झालेल्या अहवालात संबंधित सर्व नाेटा बनावट असल्याचे स्पष्ट झाले. अहवाल मिळताच नवीन कामठी पाेलिसांनी गुन्हा नाेंद करून तपास केला. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि व्यवहारांच्या नाेंदींच्या आधारे पाेलिसांनी संशयितांचा माग काढला. अखेर दाेन्ही आराेपी त्यांच्या घरातच आढळून आल्याने पाेलिसांनी त्यांना ताब्यात घेत अटक केली. बनावट नाेटांचा स्राेत शाेधण्याच्या दृष्टीनेही चाैकशी सुरू असल्याची माहिती पाेलिसांनी दिली आहे.
Powered By Sangraha 9.0