बीजिंग,
china-iran मध्यपूर्वेत गेल्या सात दिवसांपासून मोठा तणाव निर्माण झाला आहे. अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू असून दोन्ही बाजूंनी गंभीर नुकसान झाले आहे. इराणवर झालेल्या इस्त्रायलच्या हल्ल्यामुळे ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे, तर इराणच्या प्रत्यहल्ल्यांमुळे इस्त्रायल आणि अमेरिकेचा देखील मोठा धोका निर्माण झाला आहे.
आठवडाभरापूर्वी इस्त्रायलने इराणवर हल्ला केला, ज्यामुळे युद्धाची सुरूवात झाली. त्यानंतर अमेरिकेनेही या संघर्षात सक्रिय भाग घेतला. अमेरिकेने आधीच युद्धासाठी सर्व तयारी पूर्ण केली होती, ज्यामध्ये दोन सर्वात शक्तिशाली नौके तैनात केल्या होत्या आणि नौदलाची संख्या वाढवण्यात आली होती. china-iran दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अमेरिकेकडून भारतातून इराणकडे परतत असलेल्या युद्धनौकेवर पाणबुडीने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात युद्धनौका बुडाली असून ८७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. काही जणांना वाचवण्यात यश मिळाले, ज्यासाठी श्रीलंकेच्या नौदलाने रेस्क्यू ऑपरेशन केले.
इराणने या हल्ल्याचा प्रत्याहून घेतला आणि २४ तासांच्या आत अमेरिकेच्या तेलवाहतूक करणाऱ्या जहाजावर मिसाईल हल्ला केला. युद्ध काही थांबण्याचं नाव घेत नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार युद्धाला प्रोत्साहन देणारी विधानं केली आहेत. या तणावामुळे संपूर्ण जगभरात ऊर्जा संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. china-iran या परिस्थितीत चीननेही मध्यस्थीचा निर्णय घेतला आहे. सात दिवस चाललेल्या युद्धामुळे चीनचा संयम संपल्याचे दिसते आणि तो इराणच्या मदतीला धावत आहे. चीन आपला स्पेशल दूत पाठवून मध्यपूर्वेत शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणार आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी बुधवारी याची माहिती दिली.
रॉयटर्सच्या अहवालानुसार, चीनने सौदी अरेबियाच्या सरकारशी देखील संवाद साधला आहे. चीनने मध्यपूर्वेत वाढत चाललेल्या तणावाला कमी करण्यासाठी आपला दूत पाठवण्याची तयारी केली आहे. आता हे पाहणे महत्त्वाचे आहे की चीनच्या पुढाकारामुळे युद्ध थांबेल का आणि क्षेत्रात शांतता प्रस्थापित होईल का.