वर्धा,
nagpals-murder-case : वर्धा-पुलगावचे येथील वाळू व्यावसायिक भारत नागपाल यांच्या निर्घृण खून प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी मित्र परिवार, व्यापारी मित्र परिवार आणि पंजाबी सेवा समिती वर्धा आणि पुलगावच्या संयुत वतीने आज शुक्रवार ६ रोजी नामदेव मठापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला.
वरोरा तालुयातील बामर्डा वाळू घाटावर भरत नागपाल यांच्यावर दहा ते १२ जणांनी प्राणघातक हल्ला केला. यावेळी भरत नागपाल यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर त्यांचे काही साथीदार जखमी झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १२ आरोपींना अटक करून त्यांची ९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी घेण्यात आली आहे. मात्र, असे दुर्दैवी प्रकार पुन्हा घडू नये म्हणून शुक्रवारी मित्र परिवार, व्यापारी आणि पंजाबी सेवा समितीच्या वतीने वर्धा येथील नामदेव मठापासून मूक मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी फाशी देण्याची मागणी करणारे पोस्टर हातात घेऊन आणि तपास सीआयडीकडे देऊन फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवण्याची मागणी करण्यात आली. या मोर्चात पंजाबी समाज, मित्र परिवार, महिलांसोबतच मृतक भरत नागपाल यांचा दोन वर्षांचा चिमुकला वेदराज सुद्धा सहभागी झाला होता. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.