हिंगणा शिक्षक समितीची नवीन कार्यकारिणी जाहीर

06 Mar 2026 12:10:39
नागपूर,
Hingna Teachers Committee महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या हिंगणा तालुका शाखेची नवीन कार्यकारिणी जिल्हा उपाध्यक्ष उज्वल रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आली.नवीन कार्यकारिणीत तालुका अध्यक्ष म्हणून श्रीराम महाजन, तालुका सरचिटणीस म्हणून विलास चालखोर, महिला तालुकाध्यक्ष म्हणून सुवर्णा राऊत तर महिला सरचिटणीस म्हणून योगिता देवगडे यांची निवड करण्यात आली.
 

uj 
 
 
तसेच तालुका उपाध्यक्ष कबिर ब्राह्मण, कार्याध्यक्ष स्वप्नील रोकडे, संपर्क प्रमुख सुरेश झाडे, कार्यालयीन चिटणीस नितीन सरोदे, शिक्षक नेते राजेंद्र कुकडे यांची निवड झाली. Hingna Teachers Committee सल्लागार म्हणून वसंत पिसे व मधुसूदन चरपे तर जिल्हा प्रतिनिधी म्हणून मनोज गौर व ईश्वर ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणीचा विस्तार लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
सौजन्य:उज्ज्वल रोकडे ,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0