रामनगर येथे विराट हिंदू संमेलन

06 Mar 2026 19:34:09
नागपूर,
Ramnagar राष्ट्रीय स्वयंसेवक संघच्या शताब्दी वर्षानिमित्त रामनगर येथे विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून दयाशंकर तिवारी यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. शहराच्या विकासाच्या नावाखाली वड-पिंपळासारखे वृक्ष तोडले जात असून पर्यावरण रक्षण हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाला चिन्मय मिशनचे प्रमुख ब्रह्मचारी सुचेत चैतन्य, संघाचे नागपूर महानगर सहसंपर्क प्रमुख सतीश सारडा, आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष कोंडावार, संयोजक मनीष बागलकोटे, सचिव ॲड. राम पारसकर, उपाध्यक्ष अनुजा परचुरे व नंदा चौधरी उपस्थित होते.
 
Ramnagar
 
कार्यक्रमाची सुरुवात हनुमान चालीसाने झाली. पवन बावनकुळे यांनी कविता सादर केल्या, तर राधा खानझोडे यांनी छत्रपती शिवरायांवरील पोवाडा सादर केला. Ramnagar प्रियंका अभ्यंकर यांच्या चमूने कथक नृत्य सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.दीपप्रज्वलन व सरस्वती वंदनेने मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रास्ताविक मनीष बागलकोटे यांनी केले, तर सूत्रसंचालन स्वाती हुद्दार यांनी केले. यावेळी प्रभाग १३ व १४ मधील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. संमेलनानिमित्त महिलांच्या विविध स्पर्धा व भव्य रॅलीही काढण्यात आली. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम्‌ने झाली.
सौजन्य: निकिता लुटे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0