अनिल कांबळे,
नागपूर,
illegal-weapons-pistols-seized : गेल्या काही दिवसांपासून शहरात अग्नीशस्त्रांचा वापर आणि विक्री वाढली आहे. अशा गुन्हेगारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी गुन्हे शाखा सतर्क झाली आहे. सामाजिक सुरक्षा शाखेने गुरुवारी रात्री माेठी कारवाई करत, अवैध शस्त्रसाठा बाळगणाèया एका युवकाला अटक केली. आराेपीच्या ताब्यातून दाेन देशी बनावटीच्या पिस्तुलांसह मॅगझिन आणि तीन जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त केला. कासिफ गनी शेख हबीब शेख (36) असे आराेपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री सुमारे आठ वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत हाेते. दरम्यान त्यांना नंदनवन पाेलिस ठाण्याच्या हद्दीत हसनबाग पाेलिस चाैकीजवळील परिजात शाइन अपार्टमेंटमध्ये राहणाèया एका युवकाकडे अवैध शस्त्रसाठा असल्याची गुप्त माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे पाेलिस पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचांच्या उपस्थितीत संबंधित व्यक्तीच्या घराची झडती घेतली. घर झडती दरम्यान कासिफ गनी शेख याचेकडे घरात दडवून ठेवलेले दाेन देशी पिस्तुले, मॅगझिन, तीन जिवंत काडतुसे तसेच एक माेबाईल ाेन असा मुद्देमाल आढळून आला. पाेलिसांनी हा संपूर्ण मुद्देमाल जप्त करून आराेपीला ताब्यात घेतले.
प्राथमिक चाैकशीत आराेपीने पाेलिसांना सांगितले की, त्याला आपल्या पत्नी आणि मुलावर प्रचंड प्रेम आहे. काही दिवसांपूर्वी एका वाहन चालकाने त्याला कट मारत जिवे मारण्याचा प्रयत्न केला हाेता. त्या घटनेनंतर स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेबाबत त्याच्या मनात भीती निर्माण झाली. त्यामुळेच छत्तीसगड येथील आपल्या एका टेलर मित्राच्या माध्यमातून त्याने हे अवैध शस्त्र मागविल्याचा दावा आराेपीने केला.
मात्र पाेलिसांना आराेपीची ही कहाणी संशयास्पद वाटत आहे. आराेपीने ज्या व्यक्तीचे नाव सांगितले आहे, त्या व्यक्तीचा काही दिवसांपूर्वीच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती समाेर आली आहे. त्यामुळे आराेपीने दिलेल्या माहितीत विसंगती असल्याचा पाेलिसांचा संशय अधिक बळावला आहे. ही कारवाई सह. पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी , गुन्हे शाखेचे उपायुक्त राहुल माकणीकर, एसीपी अभिजीत पाटील यांचे मार्गदर्शनाखाली, सपोनि. शिवाजी नन्नावरे, शेषराव राऊत, कुणाल मसराम, अश्वीन मांगे, समीर शेख व कुणाल बोडखे यांनी केली.
शस्त्र नेमके आले कुठून
आराेपीकडे हे अवैध शस्त्र नेमके कुठून आणि काेणाच्या माध्यमातून पाेहाेचले, यामागे एखादे माेठे रॅकेट किंवा गुन्हेगारी कट तर नाही ना, याचा तपास आता पाेलिसांनी सुरू केला आहे. शहरात अवैध शस्त्रांची साखळी उघडकीस येण्याची शक्यता असल्याने या प्रकरणाकडे पाेलिसांनी गांभीर्याने पाहिले आहे.
दरम्यान, आराेपीकडून जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांच्या आधारे त्याच्याविरुद्ध नंदनवन पाेलिस ठाण्यात आर्म्स अॅक्ट तसेच महाराष्ट्र पाेलिस कायद्यांतर्गत गुन्हा नाेंदविण्यात आला आहे.