महाराष्ट्राला मिळाले नविन राज्यपाल; देशातील ९ राज्यांमध्ये मोठा फेरबदल

06 Mar 2026 13:01:19
नवी दिल्ली,  
jishnu-dev-verma-governor-of-maharashtra केंद्र सरकारने देशातील नऊ राज्यांच्या राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेशांच्या उपराज्यपालांच्या नियुक्त्यांमध्ये मोठे फेरबदल केले आहेत. या निर्णयानुसार, जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या तेलंगणाचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या नियुक्त्यांवर शिक्कामोर्तब केले असून, लवकरच या सर्व राज्यपालांचा शपथविधी पार पडणार आहे.
 
jishnu-dev-verma-governor-of-maharashtra
 
त्रिपुराचे माजी उपमुख्यमंत्री आणि तेलंगणाचे राज्यपाल म्हणून अनुभवी असलेले जिष्णू देव वर्मा आता महाराष्ट्राची जबाबदारी सांभाळणार आहेत. jishnu-dev-verma-governor-of-maharashtra अभ्यासू आणि अनुभवसंपन्न व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख असून, महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक स्थितीत त्यांचा अनुभव राज्याला मोठा फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जिष्णू देव वर्मा यांच्या पदभार स्वीकृतीसंदर्भात लवकरच अधिकृत लोकभवन पत्रक प्रसिद्ध केले जाईल.
देशभरातील या महत्त्वाच्या नियुक्त्यांमध्ये अनेक अनुभवी नेते आणि निवृत्त अधिकाऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मुख्य नियुक्त्या पुढीलप्रमाणे आहेत:
महाराष्ट्र: जिष्णू देव वर्मा (तेलंगणाहून बदली)
दिल्ली (उपराज्यपाल): तरनजीत सिंह संधू (माजी राजदूत)
लडाख (उपराज्यपाल): विनय कुमार सक्सेना (दिल्लीहून बदली)
बिहार: लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सय्यद अता हसनैन
पश्चिम बंगाल: आर. एन. रवी (तमिळनाडूहून बदली)
तेलंगणा: शिव प्रताप शुक्ला (हिमाचल प्रदेशहून बदली)
हिमाचल प्रदेश: कविंदर गुप्ता (लडाखच्या उपराज्यपाल पदावरून बढती)
नागालैंड: नंद किशोर यादव
तमिळनाडू: राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर (केरळचे राज्यपाल असूनही तमिळनाडूचा अतिरिक्त कार्यभार)
या नियुक्त्यांमुळे राज्यपाल मंडळात महत्त्वाचा फेरबदल झाला असून, अनुभवी नेत्यांच्या नेतृत्वाखाली राज्य प्रशासन अधिक सक्षम आणि कार्यक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0