लाडकी बहीण कायम तर २५ लाख महिला लखपती होणार!

06 Mar 2026 16:08:09
मुंबई,
Maharashtra Budget अर्थसंकल्पात महिलांसाठी महत्त्वाच्या निर्णयांची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला दिनानिमित्त राज्यातील लाडक्या बहिणींना शुभेच्छा दिल्या आणि “लाडकी बहीण योजना” अशीच पुढे सुरू राहणार असल्याची घोषणा केली. या योजनेसाठी आवश्यक भरीव तरतूद करण्यात आली आहे.सध्या राज्यातील सर्व जिल्ह्यांतील एकल महिलांचे सर्वेक्षण सुरु असून, त्यानंतर त्यांच्या कल्याणासाठी योग्य धोरण तयार केले जाणार आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत ३७ लाख महिलांना लखपती दीदी बनवण्यात आले आहे. पुढील काळात आणखी २५ लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे.
 

Maharashtra Budget  
 
महिला स्वयं सहायता समूहांच्या वस्तू व उत्पादनांच्या विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी १३ जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल विक्री केंद्र सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, योजनेविरोधात न्यायालयात जाऊ नका; आम्ही तुमच्या अपेक्षांची पूर्तता करणार आहोत. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा देखील करण्यात आली असून, किती रकमेपर्यंत कर्ज माफ केले जाईल याची संपूर्ण माहिती मुख्यमंत्रींनी दिली आहे. या निर्णयांमुळे राज्यातील महिला आणि शेतकरी या दोन्ही गटांमध्ये समाधान आणि उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
Powered By Sangraha 9.0