नवी दिल्ली,
No country can dominate the world जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले की आज कोणताही देश पूर्णपणे जागतिक वर्चस्व गाजवू शकत नाही. त्यांनी म्हटले की २० व्या शतकाच्या मध्यापासून स्थिर जागतिक व्यवस्था राखण्याची अपेक्षा अवास्तव होती आणि आज शक्ती विविध क्षेत्रांमध्ये विखुरलेली आहे. दिल्ली येथे झालेल्या एका कार्यक्रमाप्रसंगी बोलताना जयशंकर म्हणाले की, १९४५ किंवा १९८९ नंतर स्थापन झालेली जागतिक व्यवस्था कायमची राहील अशी अपेक्षा करणे योग्य नाही. त्यांनी सांगितले की गेल्या ७० वर्षांचा इतिहास हजारो वर्षांच्या भारताच्या इतिहासात एक छोटासा टप्पा आहे, त्यामुळे जागतिक बदल हा नैसर्गिक आहे.

परराष्ट्र मंत्री म्हणाले की, आजच्या जागतिक व्यवस्थेत दोन मुख्य घटक बदल घडवून आणत आहेत. तंत्रज्ञान आणि लोकसंख्याशास्त्र. येत्या दशकात जगाची दिशा ठरवण्यासाठी हे घटक निर्णायक भूमिका बजावतील. त्यांनी असेही स्पष्ट केले की, जगाच्या राजकारणाचे विश्लेषण अनेकदा अमेरिकेभोवती केले जाते, तरी वास्तव असा आहे की जागतिक शक्ती अनेक देशांमध्ये विभागली गेली आहे. जयशंकर यांनी सांगितले की, आज सत्तेचा अर्थ फक्त अर्थव्यवस्था किंवा लष्करी ताकद असा नाही. जगातील वेगवेगळे भाग वेगवेगळ्या क्षेत्रात बळकट होत आहेत आणि त्यामुळे जागतिक शक्ती आता अनेक देशांमध्ये आणि प्रदेशांमध्ये पसरलेली आहे. जागतिक राजकारणाचे समतोल, तंत्रज्ञानातील प्रगती, अर्थव्यवस्था, लष्करी क्षमता आणि राजनयिक प्रभाव या सर्वांमुळे पूर्णपणे वर्चस्व गाजवणारा एकही देश नाही.