किरणा दुकानदाराचा मुलगा प्रज्वल नासरे यूपीएससी परीक्षेत यश

06 Mar 2026 20:15:24
कारंजा (घा.), 
prajwal-nasre : तालुक्यातील ठाणेगाव येथील प्रज्वल धनराज नासरे याने युपीएससी परीक्षेच्या निकालात भारतातून ६७७ वा रँक घेत कारंजा तालुयाच्या यशात मानाचा तुरा रोवला. त्याचे वडील किरणा दुकानदार आहेत तर आई गृहिणी आहेत.
 
 
k
 
ग्रामीण भागात राहत असलेल्या व घरची सामान्य परिस्थिती असलेल्या प्रज्वलने या परीक्षेकरिता कुठेही कोचिंग लावले नाही. घरीच राहून ऑनलाईन कोचिंग करून सततच्या अभ्यासाने त्याने हे यश मिळविले. त्याचे पहिली ते पाचवीपर्यंतचे शिक्षण स्थानिक स्व. राजीव गांधी मेमोरीयल इंग्लिश हायस्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेज येथे झाले. पाचवीत त्याने नवोदयची परीक्षा उत्तीर्ण केल्याने सहावी ते बारावीपर्यंतचे त्याचे शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय सेलू (काटे ) येथे झाले. त्यानंतर त्याने मुत विद्यापीठातून बी. ए. व एम. ए. पूर्ण केले.
 
 
शिक्षण सुरू असतानाच आपण परीक्षेची तयारी सुरू केली. या पूर्वी दोन वेळा परीक्षा दिली. पण, यशाने हुलकावणी दिली होती. पण, आपण प्रयत्न सोडले नाहीत. तिसर्‍या, प्रयत्नात मिळाले, असल्याचे प्रज्वल नासरे याने दिली.
 
 
त्याचे आ. सुमित वानखेडे, राष्ट्रीय युवा उदय संस्थेच्या अध्यक्ष अरुणा चाफले, त्याचे शिक्षक व प्राचार्य जनार्दन धोटे, संस्थेचे सचिव पियुष चाफले, नवोदयचे शिक्षक अनंत झाडे, मोहन सावरकर, अंकित खांडवे, नितीन दर्यापूरकर, बाबाराव सोमकुवर आदींनी त्याचे अभिनंदन केले. प्रज्वल च्या वडिलांचा किराणा दुकानाचा व्यवसाय आहे. तर आई गृहिणी आहे. प्रज्वलने मिळवलेल्या अभूतपूर्व यशाबद्दल गावाकर्‍यांसह तालुयातून सर्व क्षेत्रातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Powered By Sangraha 9.0