रशिया-चीन इराणला मदत?

06 Mar 2026 10:00:58
तेहरान,
Russia-China aid to Iran मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाचा आज सातवा दिवस असून इराण, अमेरिका आणि इस्रायलयांच्यातील तणाव अधिकच तीव्र झाला आहे. इराणकडून परिसरातील अमेरिकन तळांवर तसेच इस्रायलवर क्षेपणास्त्र आणि मानवरहित हल्ले करण्यात येत आहेत, तर त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या विविध भागांवर जोरदार हवाई हल्ले सुरू ठेवले आहेत. राजधानी तेहरानसह अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस झाल्याचे वृत्त आहे.
 
 
Russia-China aid to Ira
 
दरम्यान, या संघर्षात रशिया आणि चीन इराणला मदत करत आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत पत्रकारांनी इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांना विचारणा केली असता त्यांनी सूचक उत्तर दिले. त्यांनी सांगितले की रशिया आणि चीन यांनी नेहमीच इराणला साथ दिली आहे. मात्र युद्ध सुरू असताना अधिक तपशील सांगणे योग्य ठरणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या दोन्ही देशांकडून इराणला प्रत्यक्ष मदत मिळत आहे का, याबाबत चर्चांना आणखी उधाण आले आहे.
 
 
दरम्यान, अमेरिकेने इराणवरील हल्ल्यांची तीव्रता वाढवली आहे. तेहरानसह सानंदज, बुकान, बुशेहर आणि काझविन या शहरांवर मोठ्या प्रमाणात हवाई कारवाया करण्यात आल्या. या हल्ल्यांमध्ये इराणच्या लष्करी तळांवर, क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळांवर आणि शस्त्रसाठा ठेवलेल्या ठिकाणांवर लक्ष्य साधण्यात आले. त्यामुळे इराणच्या क्षेपणास्त्र आणि मानवरहित हल्ला करण्याच्या क्षमतेला मोठा फटका बसल्याचे सांगितले जात आहे.
Powered By Sangraha 9.0