वाढत्या उन्हामुळे शाळांचा वेळ बदलला; ९ मार्चपासून सकाळी सुरू

06 Mar 2026 16:38:57
जळगाव,
School timings changed due to temperature जळगाव जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे शाळा सुरक्षिततेच्या कारणास्तव सकाळच्या सत्रात सुरू होणार आहेत. राज्यातील तापमानात लक्षणीय वाढ होत असल्याने नागरिकांना उन्हाचा तडाखा भोगावा लागत आहे. यामुळे प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा ९ मार्चपासून सकाळच्या सत्रात सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना उष्णतेपासून होणारा त्रास टाळता येईल आणि शैक्षणिक नुकसानही कमी होईल.
 
 

school and heat 
हवामान खात्याने येत्या १५ मार्चपर्यंत सौम्य उष्णतेची लाट राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील तापमान विशेषत: अधिक असल्याचे पाहायला मिळत आहे. अमरावतीमध्ये यावेळी राज्यातील सर्वाधिक ३९.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. शिक्षक संघटनांनी मागणी केलेल्या शैक्षणिक सुरक्षिततेच्या दृष्टीने हा मधला मार्ग काढण्यात आला आहे. पालक आणि नागरिकांनीही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे.
Powered By Sangraha 9.0