विदर्भस्तरीय खुली हिंदी फिल्मी गीत गायन स्पर्धेत बालाघाटचा शफिक प्रथम

06 Mar 2026 17:37:31
वर्धा,
Shafik Jafri संगीत उत्सव २०२६ अंतर्गत सई वृंद व जय महाकाली शिक्षण संस्था वर्धा द्वारा आयोजित भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विदर्भस्तरीय खुली हिंदी फिल्मी गीत गायन स्पर्धा सुरांजली ही स्पर्धा १ मार्च रोजी शिवशंकर अग्निहोत्री सभागृहात संपन्न झाली. या स्पर्धेत बालाघाटचा शफिक जाफरी याने प्रथम क्रमांक पटकावला.
 

Shafik Jafri, Balaghat singer  
सदर स्पर्धा युवा आणि ज्येष्ठ या दोन गटात घेण्यात आली. युवा गटांतर्गत बालाघाट येथील शफिक जाफरी याने प्रथम क्रमांक पटकावून १५ हजार रुपये रोख, द्वितीय पुरस्कार ८००१ रुपये तनिष्क गजभिये (नागपूर), तृतीय ५००१ रुपये विदिशा वाटकर (वर्धा), चतुर्थ ३००१ रुपये रोख व स्मृतिचिन्ह लाजरी बुरे (नागपूर) तर पाचवा पुरस्कार २००१ रुपये रोख व स्मृतिचिन्ह कोमल ढोके (अमरावती) हिने पटकावला. प्रोत्साहनपर ११ हजार १११ रुपयांचे पाच पुरस्कार कावेरी खराडे, सूरज जयस्वाल, मनीष वरघट, मीरा किरवाने, स्वरा मातुरकर यांनी प्राप्त केले.
ज्येष्ठ गटातील प्रथम Shafik Jafri पुरस्कार रोख व स्मृतिचिन्ह राजन कारंजेकर (सांगली), द्वितीय रोख व स्मृतिचिन्ह राहुल भगत (वर्धा), तृतीय रोख व स्मृतिचिन्ह अशोक तुरयाल (वर्धा), चतुर्थ रोख धर्मेश गांधी (वर्धा) तर पाचवा पुरस्कार रोख रुपये गणेश शर्मा (जालना) यांना देण्यात आला. युवा गटा अंतर्गत १० वर्षांखालील काही लहान मुलांनी अप्रतिम गाणी सादर केली. यात वीर बाजड, गाथा भिसे, मीना काटकर (अकोला) यांचा समावेश असून त्यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन संस्थेतर्फे सन्मानित करण्यात आले.स्पर्धेचे परीक्षक म्हणून अशोक खैरकार व सुनील रहाटे होते. निवेदक म्हणून सुहासताई कुर्‍हेकर, डॉ. अमर करतारी व नीलकांत देशमुख यांनी कार्य पार पाडले. ध्वनी व प्रकाशयोजना विकी पाटील यांनी सांभाळली. आभार संयोजिका स्वाती बमनोटे व हितेश बमनोटे यांनी मानले. यशस्वीतेसाठी अविनाश रिंगणे, शाम तुपकर, दीपक विध्वंसकर, आदिती देशमुख, मृणालिनी बागडदे, रेखा राऊत, जोत्स्ना देशपांडे, संहिता देशमुख, सुरेश राऊत, विपिन जुमडे, सुहास सोनटके यांनी परिश्रम घेतले.
Powered By Sangraha 9.0