नागपूर,
Symbiosis Center सिम्बायोसिस सेंटर फॉर मॅनेजमेंट स्टडीज, नागपूर येथे २७ फेब्रुवारी २०२६ रोजी मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमातून मातृभाषेचे संवर्धन व सांस्कृतिक मूल्यांचे जतन करण्याची संस्थेची बांधिलकी अधोरेखित करण्यात आली.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. वैशाली चोपडे (संचालिका, साकारदृष्टी सोशल फाउंडेशन) तर वक्त्या म्हणून कुटुंब व विवाह समुपदेशक गौरी बेलन उपस्थित होत्या.Symbiosis Center कार्यक्रमाचे आयोजन संचालक डॉ. समीर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. समन्वयन पल्लवी चौधरी व डॉ. सारिका केसवानी यांनी केले.यावेळी भाषण व नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचा समारोप प्रेरणादायी वातावरणात झाला.
सौजन्य:रूपल दोडके,संपर्क मित्र