पत्नी संगीता सोर्नालिंगमसोबत घटस्फोटाच्या अफवा, त्रिशा कृष्णनशी नाव जोडले

06 Mar 2026 11:17:54
मुंबई,
Thalapathy Vijay divorce दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता थलापती विजय सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपासून त्याच्या आगामी चित्रपटाशी संबंधित वाद सुरू असतानाच आता त्याच्या वैवाहिक आयुष्याबाबतही मोठ्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मिळालेल्या अहवालांनुसार विजयची पत्नी संगीता सोर्नालिंगम यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्याच्या बातम्या समोर येत आहेत. जवळपास २७ वर्षे टिकलेले त्यांचे वैवाहिक नाते तुटण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरात सुरू आहे.
 
 
Thalapathy Vijay divorce
माध्यमांमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी संगीता यांनी आधी कौटुंबिक पातळीवर प्रयत्न केले होते. मात्र तोडगा न निघाल्याने त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्याचे सांगितले जात आहे. काही अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान विजयकडून सुमारे २५० कोटी रुपयांची पोटगी दिली जाऊ शकते. तसेच घटस्फोटामागे विजयचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोपही केल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर विजयचे नाव अभिनेत्री त्रिशा कृष्णन हिच्यासोबत जोडले जात आहे.
दरम्यान, विजय आणि त्रिशा एका लग्नाच्या रिसेप्शनला एकत्र उपस्थित राहिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये विजय पारंपरिक पोशाखात फुलांचा गुच्छ हातात घेऊन उभा असल्याचे दिसते, तर त्रिशा त्याच्या मागून गाडीतून उतरतानाचा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या व्हिडिओनंतर चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असून काहींनी नाराजीही व्यक्त केली आहे.
 
 
विजय आणि त्रिशा Thalapathy Vijay divorce यांनी यापूर्वी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले असून त्यांच्या जोडीला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्रिशा सोशल मीडियावर विजयसोबतचे फोटो शेअर करताना तसेच त्याच्या वाढदिवसानिमित्त विशेष शुभेच्छा देताना दिसते. त्यामुळे या दोघांबद्दलच्या अफवा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.दरम्यान, विजय आणि संगीता यांच्या प्रेमकहाणीची सुरुवातही काहीशी चित्रपटासारखीच होती. विजयचा चित्रपट Poove Unakkaga प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली होती. त्याच काळात यूकेमध्ये राहणाऱ्या एका श्रीलंकन तमिळ उद्योगपतीची मुलगी असलेल्या संगीताने विजयला भेटून त्याचे कौतुक केले होते. नंतर दोघांमध्ये ओळख वाढली आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या संमतीने त्यांनी २५ ऑगस्ट १९९९ रोजी विवाह केला.सध्या या सर्व घडामोडींमुळे चाहत्यांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे. मात्र विजय किंवा त्याच्या कुटुंबीयांकडून या घटस्फोटाच्या अफवांबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे या चर्चांना अधिकृत पुष्टी मिळते का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0