‘जय भवानी, जय शिवाजी’ने शहर दुमदुमले..!

06 Mar 2026 21:56:00
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
grand-procession : राज्याचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396 व्या जयंती उत्सवाचे हिंदू तिथीनुसार शुक्रवार, 6 मार्च रोजी आयोजन करण्यात आले. सकाळी 6.30 वाजता शिवजन्म, पाळणा व गाणे, सकाळी भव्य प्रभातफेरी, दुचाकी वाहनांसह, सकाळी 10 वाजता शिवपूजन आणि संध्याकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी शिवप्रेमींनी ‘जय भवानी, जय शिवाजी’चा एकच घोष केला. शोभायात्रेत विविध शिवकालीन देखावे सादर करण्यात आले होते. ही शोभायात्रा माळीपुèयातील श्री शिवाजी चौक येथून निघाली. या शोभायात्रेत शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 

y6March-Shivjayanti 
Powered By Sangraha 9.0