एटीएमचे काच फोडून माथेफिरूचा धुमाकूळ

07 Mar 2026 16:45:59
गोंदिया,
atm vandalism शहरातील बालाघाट रोडवरील बसस्थानकाजवळ शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास एटीएम मशिनांच्या काचा फोडून माथेफिरूने धुमाकूळ घातल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत तब्बल चार एटीएम मशिनांच्या काचा फोडण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार या प्रकारामागे बसंतनगर येथील शंकर पाचे नावाचा व्यक्ती असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
 

ATM 
 
 
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीही त्याने एटीएमच्या काचा फोडल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र त्याच्या नातेवाईकांपैकी एक व्यक्ती पोलिस विभागात कार्यरत असल्याने त्याच्यावर कठोर कारवाई झाली नसल्याची चर्चा रंगत आहे. दरम्यान, याच रात्री बसंतनगर परिसरात काही चारचाकी वाहनांच्या काचाही फोडण्यात आल्याची माहिती आहे. तसेच सदर व्यक्ती वारंवार रस्त्यावरील डिव्हायडर उचलून फेकत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.atm vandalism या सतत घडणार्‍या प्रकारांमुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले असून अशा समाजकंटकाविरुद्ध तातडीने कडक कारवाई करून त्याला अटक करावी, अशी मागणी नगरवासीयांनी प्रशासन व पोलिसांकडे केली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0