अहेरी,
Aheri students selected for ISRO visit, ग्रामीण भागातील गुणवत्ता जेव्हा जिद्दीची जोड घेते, तेव्हा आकाशही ठेंगणे वाटते. याचाच प्रत्यय अहेरीमध्ये आला आहे. येथील मॉडेल स्कूलच्या पाच गुणवंत विद्यार्थ्यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) शैक्षणिक सहलीसाठी निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या विद्यार्थ्यांचा हा प्रवास चक्क विमानाने होणार असून, अहेरीसारख्या दुर्गम भागातून थेट इस्रोच्या मुख्य केंद्रापर्यंत पोहोचण्याचा हा मान या चिमुकल्यांनी मिळवला आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेत आपल्या बुद्धिमत्तेची चमक दाखवणारे हे पाचही विद्यार्थी टॉपर आहेत. यामध्ये आरुष महेश बेझंकीवार, यश सुरेश चव्हाण, सोहम सूर्यकांत मोरे, साक्षी रेषे व माही प्रमोद रामटेके यांचा समावेश आहे.
केवळ इस्रोला भेट देणेच नव्हे, Aheri students selected for ISRO visit, तर विमानाने प्रवास करण्याची संधी मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांमध्येही कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे. या शैक्षणिक सहलीमुळे विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञानातील गुपिते जवळून अनुभवता येतील, ज्यामुळे त्यांच्या भविष्यातील करिअरला एक नवी दिशा मिळणार आहे.अहेरीच्या या ’पाच रत्नांनी’ मिळवलेल्या यशाबद्दल संपूर्ण परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. शाळेचे शिक्षक आणि स्थानिक नागरिकांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.