अंतिम सामन्यात अक्षरला इतिहास रचण्याची संधी!

07 Mar 2026 14:59:37
नवी दिल्ली,
Akshar's chance to make history अक्षर पटेल इतिहास रचण्याच्या फेरीत असून फक्त तीन विकेट दूर आहे. टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात त्याला युजवेंद्र चहलचा विक्रम मोडण्याची संधी आहे. टीम इंडियाने अंतिम फेरी गाठली असून प्रत्येक खेळाडूने संघाच्या यशात मोठे योगदान दिले आहे.अक्षरने इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात विल जॅक्सचा शानदार बाउंड्री कॅच घेत सामना संघासाठी उलटवला. १४ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर शिवम दुबेच्या मदतीने कॅच पूर्ण करत त्याने संघाला निर्णायक फायदा दिला. बापू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्षरला ८ मार्च रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात इतिहास रचण्याची संधी आहे.
 
 
akshar patel
 
जर अंतिम सामन्यात अक्षर तीन विकेट घेतला, तर तो टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनेल. युजवेंद्र चहलने ८० सामन्यांमध्ये ९६ बळी घेतले आहेत, तर अक्षरने आतापर्यंत ९३ सामन्यांमध्ये ९४ बळी मिळवले आहेत. अव्वल स्थान मिळवण्यासाठी त्याला आणखी तीन बळींची गरज आहे.
 
या टी-२० विश्वचषकात अक्षर संघाचा उपकर्णधार आहे. आतापर्यंत टीम इंडियाने आठ सामने खेळले असून, अक्षर फक्त सहा सामन्यांमध्ये उपलब्ध झाला. त्याने एकूण आठ बळी घेतले आहेत. इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात त्याने फलंदाजीत दोन धावा केल्या, तीन षटकांमध्ये ३५ धावा देऊन दोन विकेट्स घेतल्या आणि मैदानात दोन उत्कृष्ट झेलही टिपले. आता अंतिम सामन्यात अक्षर पटेल संघासाठी किती योगदान देऊ शकेल, हे प्रेक्षकांसाठी मोठी उत्सुकता आहे, कारण तो इतिहास रचण्याच्या फेरीत आहे.
Powered By Sangraha 9.0