बाळ विक्री प्रकरण:डॉ. नितेश वाजपेयी याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

07 Mar 2026 15:39:14
भंडारा,
baby selling case उपचाराच्या नावाखाली बाळाची विक्री करण्याचे प्रकरण भंडारा गोंदिया जिल्ह्यात गाजत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी गोंदिया येथील डॉ. नितेश वाजपेयी याच्यावर गोंदिया पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोबतच आणखी एकाला अटक करण्यात आली आहे.
 

xddgd 
 
 
गोंदिया येथील न्यू बालाजी हॉस्पिटल चे संचालक डॉक्टर नितेश बाजपेयी यांच्या रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल झाल्या नंतर जन्मास आलेल्या बाळाची विक्री करण्याचा प्रकार दोन फेब्रुवारी रोजी उघडकीस आला होता. याप्रकरणी वरठी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत डॉक्टर बाजपेयी याच्यासह सहा जणांना यात अटक करण्यात आली आहे. तर विकलेले दोन बाळ पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यां प्रकरणात एसआयटी गठीत करण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापूरे या प्रकरणाचे तपास अधिकारी असून, एसआयटी चे प्रमुख आहेत.
 
दरम्यान भंडारा पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच गोंदियाच्या रामनगर पोलीस ठाण्यात डॉ. नितेश बाजपेयी यांच्या विरोधात आणखी एक गुन्हा करण्यात आला आहे. डिसेंबर महिन्यात विक्री करण्यात आलेले जे बाळ पोलिसांनी हस्तगत केले, त्याच्या जन्मदात्यांचा शोध पोलिसांनी लावला. छत्तीसगड राज्यातील एका अल्पवयीन मुलीची प्रसूती डॉ. बाजपेयी याने त्याच्या रुग्णालयात केली होती व त्या बाळाची विक्री केली.baby selling case अल्पवयीन मुलीची प्रसुती केल्याची माहिती पोलिसांना न दिल्याने डॉ. बाजपेयी याच्यावर उत्सुकत्याच्या कलम 4,6,8,21 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोबतच मुकेश कुमार याच्या विरोधातही गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. मुकेश कुमार यांच्या विरोधात पोक्सोसह अन्य कलवान्वये गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती राम नगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे यांनी दिली आहे.
डॉ. बाजपेयी सध्या भंडारा पोलिसांच्या ताब्यात असून तपास सुरू आहे. या प्रकरणात आणखी बऱ्याच गोष्टी पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Powered By Sangraha 9.0