भाजयुमोची आष्टीत वाळूघाट सीमांकनाची मागणी

07 Mar 2026 20:46:12
आष्टी
Bharatiya Janata Yuva Morcha, वरोरा तालुयातील बांबर्डा येथे होळीच्या पूर्वसंध्येला झालेल्या भरत नागपाल यांच्या हत्याकांडानंतर वाळूघाटांभोवती निर्माण होणार्‍या वादांच्या पृष्ठभूमीवर आष्टी तालुयातील शिरसोलीसह इतर संभाव्य वाळूघाटांचे अधिकृत सीमांकन करावे, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा, सुमित वानखेडे युथ लब व शिरसोली ग्रामवासीयांच्या वतीने तहसीलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
 

Bharatiya Janata Yuva Morcha, 
शिरसोली येथील वाळूघाटाचा सध्या लिलाव झालेला नसून मागील अनेक वर्षांपासून हा घाट अबाधित आहे. मात्र, स्पष्ट सीमांकन नसल्यास भविष्यात अनधिकृत उत्खनन, वाद किंवा कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होण्याची शयता आहे. त्या अनुषंगाने शिरसोली वाळूघाटाचे अधिकृत सीमांकन करून महसूल नकाशावर नोंद करावी, तसेच आष्टी तालुयातील सर्व संभाव्य वाळूघाटांचे सर्वेक्षण करून त्यांची अधिकृत सूची तयार करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. भविष्यातील वाद टाळण्यासाठी सीमांकन खांब व सूचना फलक लावावेत, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदन देतेवेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अनिरुद्ध दंडाळे, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष साहिल ठाकरे, स्वराज वाघ, आशिष खोपे, आकाश भगत, रुतिक घोगरे, अक्षय पचारे यांनी सुमित वानखेडे युथ लब व शिरसोली ग्रामवासींनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आले.
Powered By Sangraha 9.0