परीक्षेच्या महिन्याभरापूर्वीच फोडला बारावीचा पेपर

07 Mar 2026 09:30:29
अनिल कांबळे
नागपूर,
paper leaked राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्या इयत्ता 12 वी बाेर्डाचा पेपर एक नव्हे दाेन नव्हे तर चक्क महिनाभरापूर्वीच फुटला. ताे पेपर एका शिकवणी वर्गातून फुुटला असून या पेपर फुटीच्या प्रकरणाचे खरे केंद्र नागपूर नसून उमरेड असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी उमरेड पाेलिसांनी गुन्हा दाखल केला असून एका शिक्षकाला अटक केली आहे. अतुल चाैधरी असे पेपर फोडणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे.
 
 

पेपर फुटी
 
नागपूर जिल्ह्यातील उमरेड हे पेपरुटीचे केंद्र ठरले आहे. उमरेड येथील खासगी शिकवणी वर्गातून फुटलेल्या 12 वी बाेर्डाच्या रसायनशास्त्र पेपरमध्ये आणि उमरेड केंद्रातून फुटलेला पेपर तंताेतंत आहे. उमरेड येथील ‘टार्गेट अ‍ॅकेडमी ऑफ सायंसेस’ या खासगी शिकवणी वर्गातून हा पेपर फुटला हाेता. संस्थेचा संचालक अतुल चाैधरी याने लाखाे रुपये देऊन हा पेपर खरेदी केला हाेता. त्यानेच विद्यार्थ्यांच्या पालकांना माेठ्या प्रमाणात किंमत आकारुन हा पेपर उपलब्ध करून दिला हाेता. उमरेड पाेलिसांनी गुरुवारी मध्यरात्री अतुल चाैधरी याला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अतूलकडे 12 वी बाेर्डाचा रसायनशास्त्राचा हा पेपर 25 जानेवारी यादिवशीच पाेहचला हाेता. त्यानंतर जवळजवळ 20 दिवसांनंतर रसायनशास्त्राचा पेपर हाेता. त्यामुळे महिनाभरापूर्वीच त्याच्याकडे हा पेपर कुठून आला, याचा आता पाेलिस शाेध घेत आहेत.

बाेर्डातील कुणाचातरी हात
नागपूर येथील सेंट उर्सूला शाळेतील परीक्षा केंद्रावर 18 तारखेला रसायनशास्त्राचा पेपर सुरू असताना एक विद्यार्थीनीकडे माेबाईल आढळल्यानंतर पेपर फुटीचे प्रकरण समाेर आले आहे. या प्रकरणात सदर पाेलिसांनी आतापर्यंत 8 जणांना अटक केली आहे. दरम्यान हा पेपर जयताळा येथील विद्यासाधना केंद्रातून फुटल्याचेही पुरावे सदर पाेलिसांच्या विशेष तपास पथकाच्या हाती लागले हाेते.paper leaked त्यानंतर बाेर्डाचे अध्यक्ष डाॅ. शिवलिंग पटवे यांनी बाेर्डातून पेपर फुटला नसल्याचा दावा केला हाेता. मात्र उमरेडच्या खासगी शिकवणीवर्गाकडे परीक्षेच्या आधी 20 दिवसांपूर्वीच रसायनशास्त्राचा पेपर आढळल्याने बाेर्डातूनच कुणीतरी पेपर बाहेर पाठविल्याचा संशय बळावला आहे.
Powered By Sangraha 9.0