अनिल कांबळे
नागपूर,
crime of sexual assault एका तरुणाने शेजारी राहणाऱ्या 14 वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिचे लैंगिक शाेषण केले. मुलगी गर्भवती झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली आणि खळबळ उडाली. काेतवाली पाेलिसांनी पाेक्साेच्या कलमान्वये लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नाेंदवून आराेपीला अटक केली. भावेश साेनवणे (23) असे अटकेतील आराेपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आराेपी भावेश आणि पीडित मुलीचे कुटुंब एकाच इमारतीत भाड्याने राहतात. भावेशने पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. लग्नाचे आमिष दाखवून पीडितेला शरीर सुखाची मागणी केली. मात्र पीडितेने त्याची मागणी फेटाळली. एक दिवस पीडितेचे कुटुंब घरी नसताना ताे तिच्या घरी आला. जबरीने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तेव्हापासून ताे सतत तिचे शाेषण करीत हाेता. यामुळे पीडितेला गर्भधारणा झाली. दरम्यान पीडितेची प्रकृती खालावली.crime of sexual assault ती वारंवार ओकारी करीत असल्याने आईला संशय आला. ती पीडितेला घेऊन रुग्णालयात गेली असता गर्भवती असल्याचे उघडकीस आले. पीडितेला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता भावेशचे नाव पुढे आले. आईने मुलीसहकाेतवाली पाेलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत ठाणेदार रितेश अहेर यांनी तत्काळ लैंगिक अत्याचार आणि पाेक्साेच्या विविध कलमान्वये गुन्हा नाेंदवून आराेपी भावेशला अटक केली.