नागपूरच्या नागनदी वर वाढत आहे घातक जलपर्णी

07 Mar 2026 16:44:50
नागपूर,
Naga River नागपूरमध्ये नागनदी, पोहरा नदी आणि पिवळी नदी यांची दर वर्षी सफाई केली जाते, तरीही या नद्यांमध्ये घाण आणि कचरा जमा होत राहतो. यासाठी नदीकाठावर रहाणाऱ्या नागरिकांना प्रत्यक्ष भेटून नदीत कचरा टाकू नये, असे मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.
 
Naga River
 
शिवाजी नगर आणि नंदनवन झोपडपट्टी परिसरातील नाग नदीवर सध्या अशीच जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. येथील पुलावरून कचरा टाकल्यामुळे पाण्याचा प्रवाह अडथळा निर्माण होतो आणि पाणी साचते, Naga River ज्यामुळे या वनस्पतीस वाढीस पोषक वातावरण मिळते. हिरवीगार दिसणारी ही धोकादायक जलपर्णी नदीच्या प्रवाहाला प्रभावित करत आहे आणि फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे.
सौजन्य: सारंग टोपरे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0