जगात तिसरे...मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत

07 Mar 2026 14:40:02
मुंबई
Hurun Global Rich List 2026 India 'हुरुन ग्लोबल रिच लिस्ट २०२६' नुसार जगातील श्रीमंतांची नवीन यादी जाहीर झाली असून, यात भारताने मोठी भरारी मारली आहे. यंदा भारतातील अब्जाधीशांची संख्या ३०८ वर पोहोचली असून, चीन आणि अमेरिकेनंतर भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. जागतिक स्तरावर एकूण ४,०२० अब्जाधीशांची नोंद झाली असून, यंदा प्रथमच ४,००० अब्जाधीशांची पद्धत ओलांडली आहे.
 

Hurun Global Rich List 2026 India, India billionaires 2026, Mukesh Ambani net worth, 
रिपोर्टनुसार, यंदा भारतात २४ नवीन अब्जाधीश जोडले गेले आहेत, तर ५७ नवीन व्यक्तींनी पहिल्यांदाच या यादीत स्थान मिळवले आहे. भारतीय अब्जाधीशांची एकूण संपत्ती १० टक्क्यांनी वाढून ११२.६ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा Hurun Global Rich List 2026 India  मुकेश अंबानी ९.८ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांच्या संपत्तीत यंदा ९ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. दुसऱ्या क्रमांकावर गौतम अदानी असून, त्यांची एकूण संपत्ती ७.५ लाख कोटी रुपये आहे; मात्र, त्यांच्या संपत्तीत १४ टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे.भारतातील टॉप-१० अब्जाधीशांमध्ये मुकेश अंबानी आणि गौतम अदानीनंतर, रोशनी नादर मल्होत्रा ही एकमेव महिला आहेत, ज्यांची संपत्ती ३.२ लाख कोटी रुपये आहे. तसेच, सायरस पूनावाला यांच्या संपत्तीत ४४ टक्क्यांची सर्वाधिक वाढ झाली असून, ती ३ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे.इतर प्रमुख भारतीय अब्जाधीशांमध्ये कुमार मंगलम बिर्ला (२.५ लाख कोटी), दिलीप संघवी (२.३ लाख कोटी), अझीम प्रेमजी (२.३ लाख कोटी), नीरज बजाज (२.२ लाख कोटी), अशोक हिंदुजा (२.२ लाख कोटी) आणि राधाकिशन दमानी (१.५ लाख कोटी) यांचा समावेश आहे.हुरुन लिस्टने स्पष्ट केले आहे की, भारतातील अब्जाधीशांची संख्या व संपत्ती दोन्ही वाढत असून, देशाचे जागतिक आर्थिक प्रभाव अधिक बळकट होत आहे.
Powered By Sangraha 9.0