प्रेयसीच्या मुलांना दिली हाेती जिवे मारण्याची धमकी

07 Mar 2026 12:27:48
अनिल कांबळे
नागपूर,
khaparkheda massacre लग्नानंतरही सागर साेनालीच्या संपर्कात हाेता. ताे तिला त्याच्यासाेबत पुण्यात येण्यासाठी दबाव टाकत हाेता. त्यासाठी त्याने तिच्या दाेन्ही मुलांना जिवे मारण्याची धमकी दिली हाेती. या संबंधात राजूने खापरखेड पाेलिस ठाण्यात तक्रार सुद्धा केली हाेती. काही दिवसांपूर्वी साेनाली सागरकडे पुण्याला गेली हाेती. तेव्हा सागरने तिला दारूच्या नशेत मारहाण केली हाेती. तिने या घटनेची पुणे पाेलिसात तक्रार नाेंदवली हाेती. वारंवार त्रास देत असूनही दाेघे इंस्टाग्रामवरून एकमेकांच्या संपर्कात असल्याचा खुलासा तपासात झाला आहे.
 

खापरखेडा हत्याकांड  
 
 
दरम्यान काेराडी पाेलिसांनी आराेपी पती राजेश ऊफर् राजू व त्याची पत्नी साेनाली (34) दाेन्ही रा. वाॅर्ड क्र. 2, खापरखेडा यांना शुक्रवारी न्यायालयात हजार केले. न्यायालयाने त्यांना साेमवारपर्यंत पाेलिस काेठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सागर रामचंद्र वानखेडे (35) रा. येरला, नरखेड हा साेनालीचा मामेभाऊ असल्याचे सांगण्यात येत आहे. दाेघांनीही साेबत शिक्षण घेतले. या दरम्यान त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र साेनालीचे लग्न राजू याच्यासाेबत झाले. लग्नानंतरही सागर तिच्या संपर्कात हाेता. हाेळीनिमित्त ताे मुळगावी येरला येथे आला हाेता. गुरूवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास ताे साेनालीला भेटण्यासाठी खापरखेड्याला गेला. वाॅर्ड क्र. 2 मधील मंगल कार्यालयाजवळ ती सागरच्या माेटारसायकलवर मागे बसली आणि दाेघेही खापरखेडा-काेराडी मंदिर मार्गावर आले. या मार्गावरील काेलार नदीवरील पूल आंलाेडताच साेनालीने मुद्दाम पर्स खाली पाडला आणि पर्स उचलण्यासाठी सागरला माेटारसायकल थांबवायला लावली.khaparkheda massacre तिने घरूनच पर्समध्ये चाकू लपवून आणला हाेता. सागरने दुचाकी थांबवताच तिने सागरवर चाकूने वार केले. त्यावेळी राजूही तिथे पाेहाेचला. त्यानंतर दाेघांनीही मिळून त्याची हत्या केली. या प्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी खुनाचा गुन्हा नाेंदवून तपास काेराडी पाेलिसांकडे वर्ग केला. पुढील तपास सुरू आहे.
Powered By Sangraha 9.0