अजूनही 'या' चित्रपटाचे आकर्षण कायम... विशेष चर्चा

07 Mar 2026 13:45:05
मुंबई,
Marathi movie Aga Aga Sunbai Kay Mhantay Sasubai, मराठी चित्रपटसृष्टीत कुटुंबप्रधान आणि हलक्याफुलक्या कथानकामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ हा चित्रपट यशस्वीपणे पन्नास दिवसांचा टप्पा पार करत राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये अजूनही प्रेक्षकांना आकर्षित करत आहे. झी स्टुडिओज आणि सनफ्लॉवर स्टुडिओज निर्मित तसेच दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेला हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
 

Aga Aga Sunbai Kay Mhantay Sasubai 
मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नांदेड, जालना आणि जळगाव यांसारख्या शहरांमध्ये चित्रपटाला मोठी गर्दी होत असून आठव्या आठवड्यातही प्रेक्षकांचा प्रतिसाद कायम असल्याचे दिसून येत आहे. कुटुंबातील नातेसंबंध, भावनिक प्रसंग आणि विनोदाचा हलकाफुलका स्पर्श यांचा सुंदर संगम या चित्रपटात पाहायला मिळतो. त्यामुळेच सर्व वयोगटातील प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून दाद दिली आहे.
 
 
चित्रपटातील निर्मिती सावंत Marathi movie Aga Aga Sunbai Kay Mhantay Sasubai,  आणि प्रार्थना बेहेरे यांच्या भूमिका विशेष चर्चेचा विषय ठरल्या आहेत. सासू-सून नात्यातील भावनिक तसेच विनोदी पैलू त्यांनी प्रभावीपणे साकारले असून त्यांच्या सहज आणि नैसर्गिक अभिनयामुळे प्रेक्षकांना या पात्रांशी भावनिक नाळ जोडता आली आहे. चित्रपट पाहताना अनेक प्रेक्षकांनी हसत-हसत आणि काही प्रसंगांमध्ये भावूक होत प्रतिक्रिया दिल्या आहेत.दिग्दर्शक केदार शिंदे यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना सांगितले की, “‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’चा गौरवशाली ५० वा दिवस साजरा होत आहे, याचा खूप आनंद वाटतो. माझे नेहमी एकच मत असते की, बाई जर घर चालवू शकते तर ती चित्रपटही चालवू शकते. स्त्रीप्रधान विषयांवरील माझ्या चित्रपटांना प्रेक्षकांनी दिलेला अभूतपूर्व प्रतिसाद लक्षात घेता सासू-सूनेच्या नात्यातील भावभावना वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा हा प्रयत्न होता. या प्रयत्नाला प्रेक्षकांकडून मिळालेला प्रतिसाद अत्यंत सुखद आणि प्रेरणादायी आहे.”
 
 
दरम्यान, झी स्टुडिओज Marathi movie Aga Aga Sunbai Kay Mhantay Sasubai,  मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर यांनीही चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. भावनिक आशय आणि मनोरंजनाची सांगड असलेल्या चित्रपटांना प्रेक्षक नेहमीच पसंती देतात, हे या चित्रपटाच्या यशातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले असल्याचे त्यांनी नमूद केले.या चित्रपटाची कथा आणि संवाद वैशाली नाईक व ओंकार मंगेश दत्त यांनी लिहिले असून पटकथा वैशाली नाईक यांची आहे. छायाचित्रण आणि संकलनाची जबाबदारी मयूर हरदास यांनी सांभाळली आहे. कुटुंबातील नातेसंबंधांची भावनिक मांडणी आणि हलकाफुलक्या मनोरंजनाची जोड यामुळे हा चित्रपट अजूनही प्रेक्षकांना थिएटरकडे खेचत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
Powered By Sangraha 9.0