मानोरा,
women day तालुक्यातील काही गावांमध्ये असलेल्या वीट भट्ट्यांवर रखरखत्या उन्हात आपल्या लहानग्यांना काखेत घेऊन चिखल माती तुडवत बाळांच्या उज्वल भविष्याची चिंता वाहणार्या अनेक माता काम करीत आहेत.
मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच सूर्यदेव कोपत असून सध्या ३७ अंश एवढे तापमान आहे. रखरखत्या उन्हामध्ये वाळलेल्या विटा आपल्या मुलीला काखेत घेऊन दुसर्या कामगार मुलीच्या डोयावर विटा ठेवण्याचे काम अनेक माता करताना तालुक्यात आढळून येतात.दुपारी रणरणते ऊन आणि सकाळी हाडे गोठवणारी ठंडी अशा गारव्यामध्ये विटा थापण्याचे काम पूर्वापार अनेक वर्षांपासून ह्या माता भगिनी करताना तालुक्यातील अनेक गावांमध्ये आढळून येतात. गरीबाचे घरकुल असो की धनवंताचे महाल अशा सर्व प्रकारच्या घरांच्या निर्मितीसाठी उपयोगात येणारी वीट उपरोक्त माय भगनींच्या मेहनतीने तयार होत असल्याची दखल दै. तरुण भारत च्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने घेण्यात येऊन यांच्या क्रिया शक्तीला सलाम करण्यात आले आहे.