संवादशक्तीचाच शिक्षकाचा यशाचा मार्ग

07 Mar 2026 18:01:24
नागपूर,
Nagpur विद्यार्थ्यांना शिकविणारा शिक्षक बहुश्रुत असणे आवश्यक असून त्यासाठी वाचन, लेखन आणि संभाषण या माध्यमातून परिणामकारक संवाद साधणे गरजेचे आहे. हेच शिक्षकाच्या यशाचे खरे साधन आहे, असा सल्ला प्रेरक वक्ते व संवाद कौशल्य तज्ज्ञ डॉ. दीपक कुळकर्णी यांनी दिला. सेवासदन शिक्षण संस्था नागपूरच्या शतसंवत्सरीय महोत्सवाचा भाग म्हणून शहरातील शाळांच्या शिक्षकांसाठी शिक्षक गुणवत्ता विकास कार्यशाळेचे आयोजन शनिवारी संस्थेच्या प्रांगणात करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा कांचन गडकरी, मार्गदर्शक डॉ. दीपक कुळकर्णी, आणि सचिव वासंती भागवत प्रमुख उपस्थित होते.
 
Nagpur
 
कार्यशाळेत डॉ. कुळकर्णी यांनी शिक्षकांशी थेट संवाद साधला. त्यांनी सांगितले की शिक्षक कोणत्याही पिढीतील असला तरी तो मनाने तरुण असणे आवश्यक आहे; ज्युनियर व सिनीयर विद्यार्थ्यांनाही तो आपलाच वाटावा. शिक्षकांनी समाज माध्यमांवर सक्रिय राहणेही आता आवश्यक आहे. Nagpur ज्या शिक्षकांच्या वर्गाला विद्यार्थी दांडी मारतात, त्यांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. तसेच, संवाद प्रक्रियेत १०% संभाषण, ३०% ध्वनी (आवाज) आणि ६०% देहबोलीचा हिस्सा असतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रम दीपप्रज्वलनाने सुरू झाला, तर प्रा. भागवत भांगे यांनी प्रास्ताविकातून विषयाची माहिती दिली. अध्यक्षा कांचन गडकरी यांनी डॉ. कुळकर्णी यांचे स्वागत केले, तर डॉ. कुळकर्णी यांनी ‘जिवाभावाचे पाहुणे’ हे स्वलिखित पुस्तक कांचन गडकरी यांना भेट दिले.
 
कार्यक्रमाचे सुरेख संचालन प्रा. मोनिका खडसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ. सुधीर दळवी यांनी केले. रागेश्री पिंपळघरे यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. Nagpur यावेळी संस्थेचे पदाधिकारी बापू भागवत, डॉ. मुरलीधर चांदेकर, डॉ. कल्पना उपाध्याय, साधना हिंगवे, प्रा. सुनील पांडे यांच्यासह प्राचार्य व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
सौजन्य: बाळकृष्ण सुरतने, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0