मुंबई,
Salman Khan Kabir Bedi भारतीय चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार Salman Khan यांनी अलीकडेच ज्येष्ठ अभिनेते Kabir Bedi यांचे सोशल मीडियावर खास कौतुक केले आहे. जवळपास पाच दशकांपूर्वी त्यांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीची आठवण करून देत सलमान यांनी त्यांना “भारताचे ओरिजिनल टायगर” असे संबोधले. या कौतुकामुळे पुन्हा एकदा कबीर बेदी यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची चर्चा रंगू लागली आहे.
सलमान खान यांनी आपल्या इन्स्टाग्रामवरील स्टोरीद्वारे १९७६ मधील लोकप्रिय दूरदर्शन मालिका Sandokan ची आठवण करून दिली. त्या काळात आंतरराष्ट्रीय दूरदर्शन मालिकेत मुख्य भूमिका करणारे कबीर बेदी हे पहिल्या भारतीय अभिनेत्यांपैकी एक होते. या मालिकेमुळे त्यांना जागतिक पातळीवर मोठी ओळख मिळाली. त्यांच्या देखण्या व्यक्तिमत्त्वामुळे आणि रहस्यमय शैलीमुळे त्या काळात ते जगभरातील प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाले होते.इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये सलमान खान यांनी लिहिले की, “सॅन्डोकन… ५० वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय दूरदर्शन शो करणारे पहिले भारतीय. नेहमीप्रमाणेच देखणे आणि रहस्यमय व्यक्तिमत्त्व… केवळ मलेशियाचाच नाही तर भारताचाही ओरिजिनल टायगर.” या शब्दांत त्यांनी कबीर बेदी यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. तसेच प्रत्येकाने Salman Khan Kabir Bedi त्यांच्यासारखे मजबूत व्यक्तिमत्त्व घडवावे, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.दरम्यान, Sandokan या मालिकेचे नवे रूपांतरही लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. या नव्या आवृत्तीत मुख्य भूमिका तुर्की अभिनेता Can Yaman साकारणार आहे. या संदर्भात सलमान खान यांनी त्यालाही शुभेच्छा देत या ऐतिहासिक भूमिकेचा मोठा वारसा असल्याचे नमूद केले. “नवीन सॅन्डोकनसमोर मोठी जबाबदारी आहे,” असे म्हणत त्यांनी या मालिकेबद्दल आपली उत्सुकताही व्यक्त केली.
कामाबद्दल बोलायचे झाल्यास, सलमान खान यांच्या आगामी Battle of Galwan या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. या चित्रपटातील ‘मैं हूं’ हे पहिले गाणे व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रदर्शित झाले असून त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दमदार संगीत आणि जोशपूर्ण शैलीमुळे हे गाणे चाहत्यांमध्ये लोकप्रिय ठरत आहे.‘बॅटल ऑफ गलवान’ हा चित्रपट Salman Khan Films या बॅनरखाली तयार होत असून दिग्दर्शनाची जबाबदारी Apoorva Lakhia यांनी सांभाळली आहे. शौर्य, त्याग आणि जिद्दीची कथा मांडणाऱ्या या चित्रपटात अभिनेत्री Chitrangada Singh महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे या चित्रपटाकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.