ट्रक आणि हार्वेस्टर मध्ये विचित्र अपघात

07 Mar 2026 12:17:45
अनिल कांबळे
नागपूर,
road accident भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला दुरुस्तीसाठी उभ्या हार्वेस्टरला जाेरदार धडक दिली. यात एकाचा मृत्यू झाला, तर दाेघे जण गंभीर जखमी झाले. अपघाताची ही घटना नवीन कामठी पाेलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. जस्सा चरणसिंग (36) असे मृताचे नाव आहे. जखमी कुलदीपसिंग बाेहरसिंग (32) आणि गुरुबेजसिंग (33) यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
 

रोड असिसिडेन्ट  
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर-जबलपूर महामार्गावरील नेरी येथील कन्हान पुलाजवळ रस्त्याच्या कडेला महेश मंगेश घाटाेडे यांच्या मालकीचा एमपी-28/डीव्ही-0952 क्रमांकाचा नादुरुस्त हार्वेस्टर उभा हाेता. मध्यरात्री सुमारे 12.15 वाजता सुमारास जस्सा, कुलदीप आणि गुरुबेज हे तिघे मिळून त्याची दुरुस्ती करीत हाेते. दरम्यान, भरधाव वेगाने येणाèया ट्रक क्र. टीएन-52/जे-9072 च्या चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवत हार्वेस्टरला जाेरदार धडक दिली. या धडकेत तिघेही ट्रकच्या कचाट्यात सापडून गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.road accident मात्र, डाॅक्टरांनी तपासणीअंती जस्सा याला मृत घाेषित केले. तर कुलदीप आणि गुरुबेज यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पाेलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
........
Powered By Sangraha 9.0