किराणा दुकान चालवणाऱ्याची मुलगी झाली आयएएस

07 Mar 2026 20:26:59
लखनौ
upsc-Aastha Jain ने सिव्हिल सर्व्हिस परीक्षा २ ० २ ५ चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. यात उत्तर प्रदेशातील शामली येथील २ ३ वर्षीय आस्था जैनला ९ वी रँक मिळाली आहे. आस्थाने पहिल्याच प्रयत्नात upsc उत्तीर्ण केली होती. १ ३ १ वी रँक मिळवून ती ips बनली होती. हैदराबादेत ips च्या प्रशिक्षणातून सुट्टी घेऊन तिने सिव्हिल सर्व्हिसचा अभ्यास केला. स्वयंअध्ययनाच्या जोरावर तिने हे स्थान मिळवले.
 
 upsc आस्था jain  
आस्थाचे कुटुंब कांधला येथे राहते. तिचे वडील किराणा दुकान चालवतात. आई गृहिणी आहे. कुटुंबात तीन बहिणी आणि एक भाऊ आहे. यापैकी आस्था दुसऱ्या क्रमांकावर आहे. मोठी बहीण डॉक्टर आहे, तर तिसऱ्या क्रमांकाची बहीणही mbbs करत आहे. आयएएस बनण्यापूर्वी आस्थाने काही काळ दिल्लीत कोचिंगही केले होते. त्यानंतर तिने स्वयंअध्ययन केले.
आई ममता जैन यांनी सांगितले की, ’मुलीने यापूर्वीही 2 वेळा upsc उत्तीर्ण केली आहे. पहिल्या प्रयत्नात तिला १ ३ १ वी रँक मिळाली होती. दुसऱ्या प्रयत्नात १ ८ ६ वी रँक मिळाली. आता तिसऱ्या प्रयत्नात अखिल भारतात ९ वी रँक आली आहे.’
यूपीएससीच्या अंतिम निकालात यूपीमधील 50 हून अधिक विद्यार्थी निवडले गेले आहेत. अमरोहाच्या सुरभी यादवला १ ४ वी, बलियाच्या मोनिका श्रीवास्तवला १ ६ वी, अलीगढच्या विजय मुद्गलला ५ ४ वी आणि मेरठच्या हर्ष नेहराला ७ ४ वी रँक मिळाली आहे.
Powered By Sangraha 9.0