आ. वानखेडेंनी केला युपिएससी उत्तीर्ण प्रज्वलचा सत्कार

07 Mar 2026 20:39:50
कारंजा
UPSC success, Prajwal Nasre, तालुयातील ठाणेगाव येथील प्रज्वल नासरे यांनी लोकसेवा आयोग परीक्षेत ६७७ वी रँक प्राप्त केल्याबद्दल आ. सुमित वानखेडे यांनी प्रज्वलचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
 

UPSC success, Prajwal Nasre, 
कारंजा तालुयातील ठाणेगाव येथील सर्व सामान्य कुटुंबातील प्रज्वलने लोकसेवा आयोग परीक्षा उत्तीर्ण केली. वडील अल्पभूधारक शेतकरी, किराणा व्यावसायिक अशा सर्वसाधारण परिस्थितीतुन प्रज्वलने नवोदय विद्यालय शिक्षण घेत बिए शिक्षण पूर्ण केले. सन २०२५ मध्ये राज्यशास्त्र विषयात पदवी मिळवली. लगेच त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करत प्रशासकीय सेवा परीक्षा देण्यात सुरवात केली. प्रज्वलची जिद्द चिकाटी व अभ्यासवृत्ती मुळे कुठेही खाजगी शिक्षण न घेता त्याने ध्येय प्राप्त केले. ठाणेगाव जगदंबा मंदिर परिसरात आमदार आपल्या दारी या कार्यक्रममध्ये प्रज्वल धनराज नासरे यांचे विशेष अभिनंदन केले. यावेळी उपविभाग अधिकारी विश्वास सिरसाट, तहसीलदार अनिल निनावे, प्रशांत वानखेडे, चक्रधर डोंगरे, नीता गजाम, जगदीश डोळे, पुष्पा चरडे, भूपेश बारंगे, दिलीप जसूतकर, विनायक भांगे, जीवन चरडे, देवेंद्र नासरे यांनी अभिनंदन केले.
Powered By Sangraha 9.0