नगराध्यक्ष अॅड. प्रियदर्शनी उईके
यवतमाळ,
समाज, कुटुंब, राजकारण, उद्योग, विज्ञान, क्रीडा अशा प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपले सामर्थ्य सिद्ध केले आहे. त्यामुळे महिलांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जात असल्याचे प्रतिपादन नगर परिषद अध्यक्ष Adv. Priyadarshini Uike अॅड. प्रियदर्शनी उईके यांनी केले.
यवतमाळ नगर परिषदेत जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक‘मात त्या बोलत होत्या. यावेळी पुढे बोलताना अध्यक्ष Adv. Priyadarshini Uike उईके म्हणाल्या, महिलांच्या हक्कांबद्दल जागरूकता निर्माण करणे, त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करणे आणि समाजात त्यांना समान संधी मिळाव्यात, हा या दिवसाचा मु‘य उद्देश आहे. समाज, कुटुंब, शिक्षण, राजकारण, उद्योग, विज्ञान, क्रीडा अशा प्रत्येक क्षेत्रांत महिलांनी आपले सामर्थ्य सिद्ध केले आहे. त्यामुळे महिलांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा मानला असेही त्या म्हणाल्या. या कार्यक‘माला नगर परिषद पदाधिकारी, नगरसेवक तसेच मोठ्या सं‘येने महिला उपस्थित होत्या. कार्यक‘मादरम्यान नगर परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणार्या विविध योजनांबाबत माहिती देण्यात आली. कार्यक‘मादरम्यान महिलांचा सत्कार करण्यात आला.