मानसिक थकव्याला वेळीच ओळखा : अमित कांबळे

08 Mar 2026 19:41:17
अधिकारी, कर्मचार्‍यांसाठी मानसशास्त्रीय कार्यशाळा

यवतमाळ : 
नोकरी आणि वैयक्तिक आयुष्याचे संतुलन साधताना बहुतांश प्रसंगी आपण शरीराने नव्हे तर मनाने थकत असतो. म्हणूनच वेळोवेळी येणार्‍या या मानसिक थकव्याला वेळीच ओळखता आले तर ते आपल्या मानसिक, शारीरिक आणि भावनिक आरोग्यासाठी लाभदायक ठरते, असे मत मानसशास्त्राचे विद्यार्थी अमित कांबळे यांनी बुधवारी व्यक्त केले. लेखापरीक्षण विभागातील अधिकारी कर्मचार्‍यांसाठी झालेल्या विशेष मानसशास्त्रीय कार्यशाळेत ते बोलत होते. लेखापरीक्षण विभाग, जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-१, सहकारी संस्था यवतमाळच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासकीय इमारतीत ४ मार्चला अधिकारी व कर्मचारी वर्गासाठी ‘मानसिक थकवा दूर करण्यासाठी मानसशास्त्रीय उपाय’ या विषयावर प्रशिक्षण देण्यासाठी मानसशास्त्राचे विद्यार्थी Amit Kamble कांबळे यांना आमंत्रित केले होते.
 
 
amit
 
Amit Kamble कार्यक‘माच्या अध्यक्षस्थानी लेखा परीक्षण अमरावतीचे विभागीय सहनिबंधक सुदाम रोडगे, जिल्हा विशेष लेखापरीक्षक श्रीनिवास पांढरे, जिल्हा विशेष लेखा परीक्षक वर्ग २ पुरुषोत्तम बोबडे, लेखा परीक्षक राज्य संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर भोयर यांच्यासह विशेष लेखापरीक्षक सुजीत जाधव उपस्थित होते. या कार्यशाळेत कार्यालयीन कामकाज व कौटुंबिक जीवनातील समतोल, नकारात्मक विचारांचे व्यवस्थापन, डिजिटल युगातील नव्या अडचणींवरील उपाय तसेच ओढावलेल्या कामकाजाला यशस्वीतेने हाताळण्याचे कौशल्य अशा चार विषयावर ही कार्यशाळा घेण्यात आली. कांबळे यांनी चारही मुद्द्यांना सोप्या भाषेचा वापर करून न्याय दिला. कार्यशाळेला एकांगी न होऊ देता खेळीमेळीच्या अशा संवादी वातावरणात मानसिक आरोग्याचे महत्व त्यांनी पटवून दिले. मानवी वर्तनाच्या मुळाशी असलेल्या घटना, विचार, भावना आणि कृती या चार महत्वाच्या त्यांनी समर्पक उदाहरणातून समजावून सांगितले. मानसिक समृद्धीसाठी काही उपयुक्त बाबींचा दैनंदिन आयुष्यात अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी सरतेशेवटी केले. प्रश्नोत्तराचे निराकरण करून या कार्यशाळेचा समारोप करण्यात आला. संचालन विलास गवळी यांनी, तर आभार पराग गौतम यांनी मानले.
Powered By Sangraha 9.0