पेट्रोलपंप मालकाचा गणवेशातील पोलिसावर हल्ला

08 Mar 2026 21:09:37
घटनेचे सीसीटीव्ही फूटेज डिलिट करण्याच्या हालचाली

यवतमाळ, 
Attack on police शहरातील धामणगाव मार्गावर पेट्रोलपंपावर वाहन घेऊन गेलेल्या गणवेशातील पोलिस शिपायावर पेट्रोल मालकाने हल्ला करून मारहाण केली. ही घटना शनिवारी दुपारी ३.१५ वाजता घडली. यानंतर शिपाई तेथून निघून गेल्यानंतर पेट्रोलपंप मालकाने घटनेचे सीसीटीव्ही फूटेज डिलीट करण्यास सुरुवात केली. यवतमाळ न्यायालयात न्यायाधीशांचा अंगरक्षक म्हणून कर्तव्यावर असलेल्या गणवेशातील पोलिस शिपायाची अवस्था पाहून लोक आश्चर्य व्यक्त होते.
 
 
xeujs
 
विशेष म्हणजे या पोलिसाच्या कमरेला बंदूक होती आणि तो पूर्ण गणवेशात होता. वाहन घेऊन पेट्रोलपंपावर येताच तेथे उपस्थित मद्यधुंद मालकाने पोलिसाला थेट शिवीगाळ सुरू केली. ‘इथे वाहन लावून नको, वाहनांची गर्दी आहे’ असे बजावले.
प्रत्यक्ष तेथे कोणतीच गर्दी नव्हती. यावरही पोलिसाने आक्षेप घेतला नाही. ‘वाहन बाजूला करतो; पण का करता’, असा प्रश्न विचारताच पंप मालक थेट त्याच्या अंगावर धावून आला आणि सर्वांसमक्ष मारहाण सुरू केली.
 
 
यावेळी पोलिस केवळ बचावाचा प्रयत्न करत होता. घाबरलेल्या पोलिसाला पाहून पेट्रोल पंप मालकाला आणखीच ताव आला. त्याने मारहाण सुरूच ठेवली. कोणताही दोष नसताना बंदुकधारी पोलिसाची वागणूक पाहून उपस्थितांना आश्चर्य वाटले. घटनेची माहिती शहर पोलिस पथक पेट्रोलपंपावर पोहोचले. त्यापूर्वीच मालक कुलूप लावून पसार झाल्याची माहिती आहे.
 
 
Attack on police हा पेट्रोलपंप मालक आर्थिकदृष्ट्या मजबूत आहे. याच जोरावर त्याच्या अनेक भानगडी दबून जात असतात. याच पंपावर दिवसरात्र बंदद्वार जुगार खेळला जात असल्याचीही चर्चा आहे. याच इसमाने सार्वजनिक ठिकाणी गोळीबार केल्याचेही प्रकरण गाजले होते. सर्व प्रकारचे शौक या इसमाला आवरण्याची जबाबदारी आता पोलिस प्रशासन कशी घेते, हेच आता यवतमाळकर पाहणार आहेत.
Powered By Sangraha 9.0