कारंजात मुलींच्या जन्मदरात घसरण

08 Mar 2026 21:58:50
कारंजा लाड, 
Birth rate of girls कारंजा शहर व परिसरात २०२५ मधील वर्षभरात एकूण ३,५६२ नवजात बाळांची नोंद द झाली असून त्यामध्ये मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कारंजा परिसरात मुलींचा जन्मदर घटल्याचे चिंताजनक चित्र समोर आले आहे. कारंजा नगर परिषदेतून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २५ पर्यंत एकूण ३,५६२ बालकांचा जन्म नोंदविण्यात आला. त्यापैकी १,८७६ मुलांचा तर १,६०९ मुलींचा जन्म झाला आहे. या आकडेवारीनुसार मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या लक्षणीयरीत्या कमी असल्याचे दिसून येत आहे. एकूण जन्मांमध्ये मुलांची संख्या जास्त असून मुलींचे प्रमाण कमी असल्याने समाजातील लिंग गुणोत्तराचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
 
 
girls
 
वर्ष २०२५ मधील जन्माच्च मासिक आकडेवारीवर नजर टाकली असता जानेवारी २५ मध्ये १७१ पुरुष १११ महिला, फेब्रुवारी २५ मध्ये १६६ पुरुष व १२३ महिला, मार्च २५ मध्ये १४६ पुरुषव १२४ महिला, एप्रिल २५ मध्ये १११ पुरुष व १३३ महिला, मे २०२५ मध्ये १२८ पुरुष व ११९ महिला, जून २०२५ मध्ये १३८ पुरुषव १२९, जुलै १३७ पुरुष व १४४ महिला, ऑगस्ट २५ मध्ये १३२ पुरुष व १०९ महिला, सप्टेंबर २५ मध्ये २२९ पुरुष व २०९ महिला, ऑक्टोबर २५ मध्ये २१७ पुरुष व १४७ महिला, नोव्हेंबर २५ मध्ये १६९ पुरुष व १६१ महिला तर डिसेंबर २५ मध्ये १३२ पुरुष व १०० महिला अशाप्रकारे १,८७६ पुरुष व १,६०९ महिलांचा जन्म झाला आहे. याचा अर्थ महिलांचा जन्म दर पुरुषांच्या तुलनेत २६७ संख्येने कमी असल्याचे दिसून येते.
 
 
Birth rate of girls  दरम्यान, महिलांचा जन्मदर वाढवण्यासाठी शासनाकडून बेटी बचाओ, बेटी पढाओ यांसारख्या मोहिमा राबविल्या जात असल्या तरी समाजातील मुलांप्रती असलेला कल अजूनही पूर्णपणे कमी झालेला नाही. मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी समाजात अधिक जनजागृती होणे अत्यंत गरजेचे आहे. मुलगा आणि मुलगी यांच्यातील भेदभाव न करता दोघांनाही समान संधी देण्याची मानसिकता समाजात निर्माण झाली तरच लिंग गुणोत्तर सुधारण्यास मदत होईल असे तज्ञांचे मत आहे. दरम्यान, प्रशासन व आरोग्य विभागाकडूनही मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढावे यासाठी विविध जनजागृती कार्यक्रम, मार्गदर्शन आरोग्यविषयक उपक्रम राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.
Powered By Sangraha 9.0