"पावले रोहितची असली तरी त्यात चालणारे पाय आपलेच"; सूर्याचे फायनलपूर्वी मोठे विधान

08 Mar 2026 10:59:27
अहमदाबाद,  
suryas-statement-before-final अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवरवर होणाऱ्या वीस षटकांच्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्याची उत्सुकता संपूर्ण देशात शिगेला पोहोचली आहे. शनिवारी उशिरा रात्रीपासूनच लाखो भारतीय चाहत्यांची झोप उडाली होती. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील या निर्णायक लढतीकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.
 
suryas-statement-before-final
 
या मोठ्या सामन्याच्या आदल्या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी संघाच्या वातावरणाबाबत आणि नेतृत्वाबाबत आपले विचार मांडले. नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारून साधारण सहा महिने झाल्यानंतर संघातील तरुण खेळाडूंशी कसे वागावे याची खरी जाणीव आता झाली असल्याचे त्यांनी सांगितले. खेळाडूंना वडील किंवा मोठ्या भावासारखे मार्गदर्शन करण्यापेक्षा त्यांना स्वतःच्या पद्धतीने खेळण्याची मोकळीक देणे अधिक उपयुक्त ठरते, असे त्यांनी स्पष्ट केले. suryas-statement-before-final संघातील प्रत्येक खेळाडूला आपले मत मांडण्याची संधी आणि मैदानावर स्वतःच्या शैलीत खेळण्याचे स्वातंत्र्य दिल्यास त्यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरी मिळते, असा अनुभव सूर्यकुमार यांनी सांगितला. या बाबतीत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याशी त्यांचे विचार जुळतात. गंभीर यांच्या मते या स्वरूपाच्या खेळात काही चेंडूंमध्ये झटपट धावा काढणेही तितकेच महत्त्वाचे असते, जितके मोठे शतक.
सूर्यकुमार यांनी सांगितले की, माजी कर्णधार रोहित शर्मा यांच्या नेतृत्वातून त्यांनी अनेक गोष्टी शिकल्या. त्यांच्या पावलांवर चालण्याचा प्रयत्न करत असताना स्वतःची वेगळी शैलीही त्यांनी संघात आणली आहे. त्यामुळे संघातील वातावरण अधिक मोकळे आणि आत्मविश्वासपूर्ण झाले आहे. suryas-statement-before-final ड्रेसिंग रूम वातावरणाबाबत बोलताना सूर्यकुमार यांनी विनोदी शैलीत सांगितले की, खेळाडू त्यांना फारसे बोलू देत नाहीत. प्रत्येकजण स्वतःच्या पद्धतीने तयारी करतो. खेळाडूंना स्वातंत्र्य दिले की मैदानावर त्यांचे खरे व्यक्तिमत्त्व दिसून येते, असे त्यांनी नमूद केले. संघाची तुलना त्यांनी एका सुंदर फुलांच्या गुच्छाशी केली. प्रत्येक फुलाची रंगत आणि वैशिष्ट्य वेगळी असते, तसेच संघातील प्रत्येक खेळाडूची क्षमता आणि ताकदही वेगळी असते. सर्वांना योग्य जागा आणि संधी मिळाली तरच संपूर्ण संघ अधिक बळकट होतो, असे त्यांनी सांगितले.
अंतिम सामना हा त्यांच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात मोठा क्षण ठरू शकतो, असे मान्य करतानाही सूर्यकुमार यांनी आपली हलकीफुलकी शैली कायम ठेवली. रोहित शर्मा यांची जागा भरणे कठीण आहे का, असे विचारले असता त्यांनी हसत उत्तर दिले की, पावले रोहित यांची असली तरी त्यात चालणारे पाय आपलेच आहेत. मात्र या मोठ्या सामन्याचा दबाव असल्याचे त्यांनी मान्य केले. तरीही विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळण्याची संधी आयुष्यात वारंवार मिळत नाही, आणि तीही आपल्या देशात मिळत असल्याने उत्साह अधिक असल्याचे सूर्यकुमार यादव यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0