.महिला सक्षमीकरणाच्या उपक्रमांत वर्धा अव्वल : पालकमंत्री डॉ. भोयर

08 Mar 2026 22:22:24
* ५० पर्यवेक्षिकांना लॅपटॉपचे वितरण
वर्धा, 
Dr. Bhoyar वर्धा जिल्हा हा राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांची कर्मभूमी आहे. याच मातीने सिंधूताई सपकाळ यांच्यासारखी थोर समाजसेविका देशाला दिली. महिला, भगिनी आणि अंगणवाडी सेविकांच्या रतातच माणुसकी आणि सेवेचा वारसा असल्याने महिला व बालविकास विभागाच्या महिला सक्षमीकरणाच्या अनेक निर्देशकात वर्धा जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले.
 
 
lop
 
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने चरखागृह येथे महिला व बाल कल्याण विभागाद्वारे आयोजित पालकमंत्री नारीशक्ती सन्मान सोहळा व अंगणवाडी सेविक, मदतनिस यांच्या कला व सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन, गिमाटेक मॅन्युफॅचरिंग इंडस्ट्रीच्या संचालक प्रेमलता मोहता, माईर्स एमआयटी संस्थेच्या विश्वस्त स्वाती कराड (चाटे), अतिरित मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्निल बेले, महिला व बालकल्याण अधिकारी मनिषा कुरसंगे आदी उपस्थित होते.
 
 
ना. भोयर यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुयात महिला व बालकल्याण विभागासाठी स्वतंत्र कार्यालय सुरू करण्याचा मानसही यावेळी व्यत केला. लवकरच बचतगटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी विशेष विक्री केंद्र उमेद मॉलची निर्मिती केली जाणार असल्याचे ते म्हणाले. प्रशासकीय कामकाजात गती आणण्यासाठी आणि अंगणवाडी पर्यवेक्षिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी गिमाटेक इंडस्ट्रीजच्या माध्यमातून ५० लॅपटॉप वितरित करण्यात आले. प्रेमलता मोहता यांनी सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या या मदतीबद्दल पालकमंत्री डॉ. भोयर यांनी आभार मानले.
 
 
Dr. Bhoyar  स्वातंत्र्य चळवळीच्या कालावधीपासूनच महिला पुढे आल्या आहेत. आज सर्वच क्षेत्रात महिला पुढे असून प्रत्येक क्षेत्रात आपले नावलौकिक करित आहे, असे जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी सांगितले. सर्व मिळून सुदृढ व सक्षम भारत घडवू या, असे स्वाती कराड (चाटे) म्हणाल्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन, प्रेमलता मोहता यांनीही मनोगत व्यक्त केले. पालकमंत्री डॉ.पंकज भोयर व मान्यवरांच्याहस्ते महिला अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, विद्यार्थीनींचा सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक मनिषा कुरसंगे यांनी केले. संचालन व आभार पल्लवी पुरोहित यांनी मानले. यावेळी अंगणवाडी सेविका, मदतनिस, बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उद्घाटनानंतर अंगणवाडी सेविका व मदतनिससाठी आयोजित कला व सांस्कृतिक महोत्सवांतर्गत विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.
Powered By Sangraha 9.0