“तु मला आवडतेस”; सुनेला मागून मिठी आणि सासऱ्याने केले लज्जास्पद कृत्य

08 Mar 2026 16:16:07
जालना,  
jalna-crime-news जालना जिल्ह्यातील बदनापूर परिसरात संतापजनक घटना घडली आहे. चुलत सासऱ्याने आपल्या सूनचा विनयभंग केल्याची शिकायत पीडितेने पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
 
jalna-crime-news
 
पीडितेच्या फिर्यादीनुसार, शेतात गेली असताना तिच्या मागे चुलत सासरे आले. त्यांनी तिच्या मागे जाऊन आपल्याकडे खेचले आणि “तु मला आवडतेस” असे सांगत तिला खाली पाडले. त्यानंतर तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले आणि तिच्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला केला. पीडितेला घडलेला प्रकार इतरांनाही सांगू नये, अशी धमकीही दिली. jalna-crime-news पीडितेने प्रतिकार करत घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला, पण आरोपीने पडलेला लाकडी दांडा तिच्यावर फेकून मारला. त्यामुळे तिच्या हाताला दुखापत झाली. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. भीतीग्रस्त पीडितेने लगेचच पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद नोंदवली. त्यानुसार चुलत सासऱ्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत. ही घटना संपूर्ण परिसरात मोठ्या धक्क्याचे कारण ठरली आहे.
Powered By Sangraha 9.0