‘ग्रंथालय भारती’चेराज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

08 Mar 2026 21:48:09
नागपूर, 
‘Granthalaya Bharati’ ‘ग्रंथालय भारती’तर्फे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. मंगला गोविंद पांडे उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार वडाळा मुंबईच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्राचे ग्रंथालय दिलीप शिवराम नवेले, परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातल्या बोरी येथील जयकुमारजी जैन सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथालय नेमीनाथ जयकुमार यांनी जाहीर झाला.
 
 
gran
 
 (संग्रहित छायाचित्र)
 
‘Granthalaya Bharati’  साधना विनोद लोकरे स्मृती उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार कोल्हापूरच्या करवीर वाचन मंदिरास जाहीर झाला. गुलाबबाई राधाकिसन बाहेती स्मृती उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातल्या रिद्धपूर येथील शहीद भगतसिंग सार्वजनिक वाचनालयाचे सचिव प्रदीप त्र्यंबक चौधरी यांना जाहीर झाला. हे पुरस्कार रविवार १५ मार्चला रामनगरातील श्रीराम सभागृहात चार वाजता आयोजित कार्यक‘मात प्रदान केले जातील. अध्यक्षस्थानी ग्रंथालय भारतीचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. राजशेखर बालेकर राहणार असून या ग्रामायण प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल सांबरे, प्रमुख वक्ते प्रसिद्ध स्तंभलेखक अमोल पुसदकर राहणार आहेत. ग्रंथप्रेमींना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0