मास्टरमाईंड ‘बंटी-बबली’ अटकेत
दिग्रस,
‘Grow Capital’ financial scam जादा परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गाजत असलेल्या ‘ग्रो कॅपिटल’ आर्थिक घोटाळ्यात अखेर मोठी कारवाई झाली आहे. या प्रकरणातील मास्टरमाईंड म्हणून ओळखले जाणारे पुष्पांजली दिनेश आणि मनोज अशोक पाटील उर्फ बंटी-बबली यांना अटक करण्यात पुसद पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या दोघांची न्यायालयात हजेरी लावल्यानंतर त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून या अटकेमुळे प्रकरणाच्या तपासाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दिग‘स शहरात जादा परताव्याचे आमिष दाखवत सात जणांच्या टोळीने तब्बल ७ कोटी लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. शिक्षक, महिला तसेच सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करून ही फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आधीच दिग‘स येथील केंद्रप्रमुख गिरीश दुधे, त्याचा भाऊ शिक्षक विनोद दुधे आणि गिरीश दुधेचा मुलगा मंदार दुधे यांना अटक झाली असून ते सध्या यवतमाळ कारागृहात आहेत. तपासादरम्यान संपूर्ण जाळ्यामागे विश्वांजली आणि ग्रो कॅपिटल या कंपन्यांचे कथित मालक पुष्पांजली रंधेरिया आणि मनोज पाटील यांचा प्रमुख हात असल्याची माहिती समोर आली. बंटी-बबली या चित्रपटाच्या धर्तीवर या दोघांनी एक टीम तयार करून सर्वसामान्य नागरिकांना जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.
‘Grow Capital’ financial scam माहितीनुसार, येथील गिरीश दुधे हा दोघांच्या संपर्कात आला आणि कमिशनच्या आमिषाला बळी पडला. त्याच्या माध्यमातून अनेकांनी गुंतवणूक केली. मात्र आतापर्यंत केवळ ३७ गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे अधिकृत तक‘ार नोंदवली आहे. या आर्थिक घोटाळ्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी हर्षवर्धन यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक रवी चव्हाण, सुनील मदने, पंकज पातुरकर, राहुल मडावी व पुसद पोलिस गेल्या दोन महिन्यांपासून करीत दरम्यान, मु‘य सूत्रधार समजल्या जाणार्या बंटी-बबली जोडीच्या अटकेमुळे तपास अधिक वेगाने पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणात अजून काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने आता पोलिस पुढे कोणती कारवाई करतात आणि गुंतवणूकदारांना न्याय कसा मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.