यवतमाळ,
Holikotsav शासकीय निरीक्षणगृह व बालगृह यवतमाळ येथे मुलांमध्ये एकमेकांविषयी बंधुभाव नांदावा, सण उत्सव कौटुंबिक वातावरणात साजरे केले जावे तसेच धार्मिक व पारंपारिक सण उत्सव यांचे महत्व व त्याबाबत माहिती होण्याचे उद्देशाने बालगृहात होळी सणानिमित्य बालकांनी पुरणपोळीचा आस्वाद घेतला.
यवतमाळ जिल्हा बंजाराबहुल असून या समाजामध्ये होळी उत्सव त्यांच्या पद्धतीने साजरा केला जातो. बंजारा समाजाची एक आगळीवेगळी प्रथा आणि एक वेगळा सण म्हणजे होळी. सर्व समाजामधून बंजारा समाजामध्ये होळी सणाचे विशेष महत्त्व आहे. ही होळी आगळ्यावेगळ्या स्वरूपात नाच गाणे आणि एकमेकांच्या घरी जाऊन एकमेकांच्या कुटुंबांना भेटी देणे, नाच गाणे आणि आनंद देणे, या वेगळ्या पद्धतीने साजरा होत असते परंपरा संस्कृती याचे बालगृहाहातीत प्रवेशितांना जवळून दर्शन व्हावे या उद्देशाने बालगृहात बंजारा समाजातील राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या प्रदेश कार्याध्यक्ष निर्मला आडे, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष रेखा चव्हाण, यवतमाळ तालुकाध्यक्ष ममता राठोड, शहर उपाध्यक्ष शुभांगी राठोड, आशा राठोड व इतर महिला सदस्यांनी अनाथ मुलांसोबत होळी साजरी केली मुलांना सोबत फळे व चिवडा केले.
Holikotsav कार्याध्यक्ष निर्मला आडे यांनी अनाथ बालकांसोबत होळी साजरी करण्याचे इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी मुलांसाठी खाऊ आणून मुलांसोबत नृत्य करून त्यांचा आनंद द्विगुणीत केला. रंगपंचमीला रंगांची उधळण येते, तसेच तुमच्या जीवनात विविध रंग यावेत, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. यावेळी अधीक्षक गजानन जुमळे, समुपदेशक पूजा राठोड, लिपीक सुनील हारगुडे, आनंद पवार, मंगेश वाघाडे उपस्थित होते.