हावरापेठ येथे महिला दिन साजरा

08 Mar 2026 15:42:24
नागपूर,
Howrah-peth Nagpur हावरापेठ येथील गजानन भक्त माधुरी मेहर यांच्या निवासस्थानी Iमहिला दिना निमित्त हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात पार पडला. रंगपंचमीच्या निमित्ताने उपस्थित महिलांना गुलालाचा टिळा लावून महिला दिन साजरा करण्यात आला.
 
 
rang
 
 
कार्यक्रमाच्या प्रारंभी गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सविता वंजारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माधुरी मेहर, भस्मे वनिता सुपारे, वर्षा मेहर आदी महिला उपस्थित होत्या.आजच्या आधुनिक काळात महिलांनी शिक्षण, कर्तृत्व आणि आत्मविश्वासाच्या जोरावर विविध क्षेत्रांत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. महिलांनी स्वतःच्या क्षमतेची जाणीव ठेवून शिक्षण, कौशल्य आणि धार्मिक मार्गाने पुढे जावे,Howrah-peth Nagpur असे मत गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रचारिका वनिता सुपारे यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाच्या शेवटी माधुरी मेहर यांनी उपस्थित सर्व महिलांना हळदी-कुंकू व गुलालाचा टिळा लावून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. अल्पोपहाराने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
संपर्क : रमेश मेहर,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0