फक्त ३ गावांत २३ कोटींचे अवैध उत्खनन

08 Mar 2026 20:34:19
रेल्वे गौण खनिज घोटाळ्यात ईटीएस मोजणी अहवाल

यवतमाळ,
Illegal minor mineral mining वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिलेल्या आदेशानंतर ईटीएस मोजणीचा प्राथमिक अहवाल प्राप्त आहे. यामध्ये एकट्या कळंब तालुक्यातील बेलोना, चापर्डा व घोटी या तीन ठिकाणच्या मोजक्या गटांत ३ लाख ३६ हजार ७०७ ब‘ास गौण खनिज उत्खनन झाल्याचे समोर आले आहे. या मुरुमाची ७०० रुपये ब‘ासप्रमाणे २३ कोटी ५६ लाख ९४ हजार ९०० रुपये किंमत होत आहे. ५ पट दंड गृहित धरल्यास १०० ही रक्कम जात आहे. जवळपास ३३ किलोमिटर अंतरामध्ये ईटीएस मोजणीची मागणी करण्यात आली असून संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याने कारवाईची मागणी तक‘ारकर्ते अमोल कोमावार यांनी केली आहे.
 
 
Illegal minor mineral mining
 
या प्रकल्पांतर्गत यवतमाळ तालुक्यातसुद्धा ईटीएस मोजणी सुरू असून काही प्रमाणात अहवाल तयार झाला आहे. मात्र बांधकाम विभागाचे अधिकारी सहकार्य करीत नसल्याने तयार करण्यात अडचण जात असल्याचे यवतमाळ तहसीलदारांनी अहवालात म्हटले आहे. यवतमाळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज काढण्यात आले. पारवा, गोधणी, वडगाव रोड, जांब, वाकी, भोसा, कारली, चापडोह इत्यादी ठिकाणची मोजणी झाली असून इतर भागांत सुरू आहे. उमरखेड येथे भूमी अभिलेख तसेच बांधकाम विभागाने केलेल्या ईटीएस मोजणीत १७ गटांपैकी गटांचे अहवाल प्राप्त झाले असून ५ लाख ७५ हजार ५३२ ब्रास अतिरिक्त ब‘ास मुरुमाचे उत्खनन केल्याचे समोर आले आहे. याची किंमतसुद्धा शासकीय दरांनुसार ४० कोटींच्या जवळपास आहे. याही रकमेच्या पाच पट दंड केल्या जाऊ शकतो.
 
 
 
Illegal minor mineral mining  कळंब तालुक्यात अनेक भागात रेल्वेरुळ टाकण्यात आल्याने आता मात्र तेथील मोजणी करणे शक्य नसल्याची समोर आली आहे. ही मोजणी फक्त परवानगी घेतलेल्या भागातील अवैध उत्खननाची करण्यात येत आहे. अनेक भागात परवानगी न घेता उत्खनन झाले असून तेथील मोजणी शिल्लक आहे. या प्रकरणात २७ ऑगस्ट २०२० पासून सातत्याने तक‘ारी करण्यात आल्या. मात्र शासकीय अधिकार्‍यांनी प्रकरण दडपण्याचेच प्रयत्न केले.

पुसद भागातील घोटाळा
पुसद भागात कोट्यवधी रुपयांचे अवैध उत्खनन झाले असताना पुसदच्या उपविभागीय अधिकार्‍यांनी थातुरमातुर मोजणी करून कुठेही अवैध उत्खनन झाले नसल्याचे अहवालात म्हटले आहे. वास्तविक विधानसभा उपाध्यक्षांनी तक‘ारकर्ते अमोल कोमावार यांच्या समक्ष मोजणी करण्याचे आदेश दिले होते. या आदेशांचे पालन करण्यात आले नाही. सॅटेलाईट चित्रातसुद्धा प्रचंड उत्खनन झाल्याचे दिसून येते. त्यामुळे कोमावार आता शपथपत्रावर लिहून देणार असून पुन्हा तपासणी करण्याची मागणी करणार आहेत. यासाठी लागणारा खर्चसुद्धा ते स्वत: देणार आहेत. या भागात ५०० कोटींपेक्षा जास्त रकमेचे अवैध उत्खनन झाल्याचा कोमावार यांचा दावा आहे. यापूर्वीच त्यांनी पुसद भागात योग्य पद्धतीने मोजणी केली जात नसल्याने अहवाल चुकीचा देण्याची शंका उपस्थित केली होती.
खनिकर्म विभागाचे दुर्लक्ष
Illegal minor mineral mining अवैध गौण खनिज उत्खननात खनिकर्म विभागाची महत्त्वाची भूमिका असायला पाहिजे. मात्र ईटीएस मोजणीसाठी या विभागाने साधे मनुष्यबळ किंवा अधिकारीसुद्धा उपलब्ध करून दिले नाहीत. त्यामुळे अनेक तांत्रिक बाबी तपासताना महसूल, तसेच बांधकाम कर्मचार्‍यांना अडचणी जात आहेत. हे सर्व जाणीवपूर्वक केल्या जात असून कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यात खनिकर्म अधिकार्‍यांना निलंबित करण्याची मागणी अमोल कोमावार यांनी केली आहे.
Powered By Sangraha 9.0