रस्ते व पुलांसाठी अर्थसंकल्पातून ४२ कोटी मंजूर
पुसद,
महाराष्ट्राचा २०२६-२७ या वर्षाचा अर्थसंकल्प राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक‘वारी विधानसभेत सादर केला. सर्व घटकांना न्याय देणारा, विकासाला गती देणारा शेतकरी, महिला, युवक आणि उद्योग क्षेत्राला बळकटी देणार्या या अर्थसंकल्पात पुसद मतदारसंघासाठी महत्त्वपूर्ण निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्यमंत्री Indranil Naik इंद्रनील नाईक सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पुसद तालुक्यातील राज्यमार्ग, जिल्हामार्ग व ग्रामीणमार्ग तसेच त्या मार्गांवरील पुलांच्या बांधकामासाठी ४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीमुळे पुसद मतदारसंघातील रस्ते व दळणवळण व्यवस्था मजबूत होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पुसद मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यमंत्री Indranil Naik इंद्रनील नाईक यांनी जणू चंगच बांधला आहे. जास्तीत जास्त निधी आणण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न स्पष्टपणे दिसून येत आहे. मागील आठवड्यात पुसद एमआयडीसीतील उद्योगांना चालना देण्यासाठी व स्थानिक तरुणांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी ७२ कोटी रुपयांचा निधी एमआयडीसीच्या पायाभूत सुविधांसाठी मंजूर करून आणण्यात आला आहे. त्यानंतर आता अर्थसंकल्पातून पुसद मतदारसंघातील रस्ते विकासासाठी ४२ कोटी रुपयांचा निधी करण्यात आल्याने येत्या काळात पुसद मतदारसंघातील रस्ते अधिक दर्जेदार व सुरक्षित होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या निधीमुळे मतदारसंघातील विकासाला नवी गती मिळणार असून उद्योग, व्यापार आणि दळणवळण व्यवस्थेला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
माझा पाठपुरावा सातत्यपूर्ण
पुसदच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकारच्या जास्तीत जास्त निधी आणण्याचा माझा प्रयत्न कायम राहील. पुसद मतदारसंघातील उद्योग, रोजगार व पायाभूत सुविधांच्या विकासासाठी नाईक परिवार सातत्याने काम करत राहील.
इंद्रनील नाईक, राज्यमंत्री