आज जागतिक महिला दिन

08 Mar 2026 11:02:33
सतिश वखरे
हिंगणघाट,
International Women’s Day 2026,दरवर्षी ८ मार्च रोजी जगभरात जागतिक महिला दिन साजरा केला जातो. हा दिवस स्त्रियांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी, त्यांच्या अधिकारांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि समाजातील समानतेच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी साजरा केला जातो. आजच्या काळात स्त्रिया शिक्षण, विज्ञान, राजकारण, क्रीडा, उद्योग, कला अशा सर्व क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. त्यामुळे महिला दिन हा केवळ उत्सव नसून स्त्रियांच्या संघर्ष, कर्तृत्व आणि स्वाभिमानाचा गौरव करणारा दिवस आहे.महिला दिनाची सुरुवात स्त्रियांच्या हक्कांसाठी झालेल्या चळवळीमधून झाली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अनेक देशांमध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार, समान वेतन आणि चांगल्या कामाच्या परिस्थितीसाठी संघर्ष करावा लागला. या संघर्षातूनच महिलांच्या अधिकारांबद्दल जागरूकता वाढू लागली आणि त्यातून महिला दिन साजरा करण्याची परंपरा निर्माण झाली. नंतर United Nations नेही या दिवसाला मान्यता दिली आणि १९७५ पासून जागतिक स्तरावर हा दिवस अधिकृतपणे साजरा केला जाऊ लागला.
 

International Women’s Day 2026, 
 
 

भारतातही महिलांनी अनेक क्षेत्रांत मोठे योगदान दिले आहे. शिक्षण, सामाजिक कार्य आणि स्वातंत्र्यलढ्यातही महिलांनी महत्त्वाची भूमिका बजावली. Savitribai Phule यांनी मुलींच्या शिक्षणासाठी मोठा लढा दिला आणि समाजात शिक्षणाची ज्योत पेटवली. तसेच Rani Lakshmibai यांनी स्वातंत्र्यलढ्यात पराक्रम दाखवून स्त्रीशक्तीचे अद्वितीय उदाहरण घालून दिले. आजही अनेक महिला विज्ञान, प्रशासन, क्रीडा आणि उद्योग क्षेत्रात यशस्वी होत समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहेत.

आजच्या आधुनिक International Women’s Day 2026, युगात महिलांना अनेक संधी उपलब्ध झाल्या असल्या तरी काही ठिकाणी अजूनही स्त्रियांना भेदभाव, अन्याय आणि हिंसाचाराचा सामना करावा लागतो. त्यामुळे समाजाने स्त्री-पुरुष समानतेचा विचार स्वीकारणे अत्यंत गरजेचे आहे. महिलांना शिक्षण, सुरक्षितता आणि स्वावलंबनाच्या संधी मिळाल्यास त्या समाजाच्या प्रगतीत अधिक प्रभावीपणे योगदान देऊ शकतात.

जागतिक महिला दिन आपल्याला हे स्मरण करून देतो की समाजाच्या प्रगतीसाठी स्त्रियांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने महिलांचा आदर करणे, त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि त्यांना समान संधी देणे ही आपली जबाबदारी आहे. स्त्रीशक्तीचा सन्मान केल्याशिवाय खऱ्या अर्थाने प्रगत आणि समतोल समाज निर्माण होऊ शकत नाही. म्हणूनच महिला दिन हा स्त्रीशक्तीचा गौरव करणारा आणि समानतेचा संदेश देणारा प्रेरणादायी दिवस आहे. 

 
पंधरा वर्षात महिलांसाठी विविध माध्यमातून काम करत असताना अनेक चांगले, वाईट अनुभव गाठीशी आहेत. स्त्री शिक्षित तर होत आहे पण मानसिक दृष्ट्या सक्षम नाही. त्यासाठी काम करण्याची गरज आहे. आजपर्यंत एका संस्थेत पदाधिकारी म्हणून काम करीत होते. त्यामुळे काही मर्यादा होत्या. आता हिंगणघाटातील मतदारांनी आपल्याला नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली. त्या संधीचे सोने शहराच्या विकासासाठी करायचे तर आहेच सोबत माझ्या भगिनी सक्षमकशा होतील यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवायचे असल्याचे नप अध्यक्ष डॉ. नयना तुळसकर यांनी जागतिक महिला दिनाच्या पुर्वसंध्येला त्या तरुण भारतसोबत बोलताना सांगितले.
 
International Women’s Day 2026, 
त्या पुढे म्हणाल्या की, महिलांच्या मानसिकदृष्ट्या सक्षमीकरणाकरता जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मानसशास्त्रज्ञांचे मार्गदर्शन व महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले आहे. आपल्या शिक्षणाचा आणि पक्षाने दिलेल्या जबाबदारीला न्याय देण्याचा आपला प्रयत्न आहे. जातीय, भाषिक, सांस्कृतिक, आर्थिक किंवा राजकीय विभाजनाचा विचार न करता महिला ही तिच्या कर्तृत्वावर ओळखली जावी यासाठी आपल्या पदाचा सदुपयोग करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
या शिवाय महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी उद्योग जगत संकुल बनवण्याचा निर्धार आहे. त्यासाठी महिला बचत गटांना एकत्र करून त्यांच्यासाठी विविध योजनांचा लाभ उपलब्ध करून त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवायचे आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.महिला सक्षमीकरणासाठी केंद्र आणि महाराष्ट्र सरकार विविध योजना राबवत आहे, ज्यामध्ये लाडकी बहीण योजना, सुकन्या समृद्धी योजना, उज्ज्वला योजना आणि महिला समृद्धी योजना प्रमुख आहेत. प्रधान मंत्री मातृ वंदना योजना, महिला हेल्पलाइन योजनांचा लाभ गरजू प्रत्येक महिलेला मिळावा असा आपला नगर पालिकेच्या वतीने प्रयत्न आहे.
आजची स्त्री अजूनही स्वतंत्र नाही. त्याला अनेक बाबी कारणीभूत आहेत. प्रत्येक स्त्रीने जर स्वतःला सन्मान दिला तर जगही तिला सन्मानाने वागवेल. पण, तिने स्वतःची शक्ती जर ओळखलीच नाही तर जगही तिला त्याच दृष्टीने बघतो असे त्या म्हणाल्या. प्रत्येक महिलेने संधीचं सोनं करावं, आत्मविश्वासाच्या बळावर नवीन आव्हान पेलण्यासाठी सज्ज व्हावं, समाजमनात निर्माण झालेल्या भ्रामक संकल्पना दूर करण्यासाठी धडपडावं आणि नवीन पिढीला आपण काही देवू शकतो हा विचार करून आदर्श जीवन जगावं तेव्हाच खर्‍या अर्थाने महिलादिनाचं सार्थक होईल असे नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर म्हणाल्या.
Powered By Sangraha 9.0