पकडलेल्या प्राण्यांना स्थलांतरित करण्याची योजना

08 Mar 2026 18:20:17
वन विभाग ५० बिबट्यांना वनतारा येथे हलवणार
 
नामदेव भदे
नागपूर, 
leopard attacks वाघ आणि बिबट्यांचे हल्ले वाढल्यानंतर नोव्हेंबर २०२५ मध्ये पकडलेल्या काही प्राण्यांना स्थलांतरित करण्याची योजना आखण्यात आली होती. यासंदर्भात एक प्रस्ताव तयार करण्यात आल्यानंतर आता नागपूरसह महाराष्ट्रातील एकूण ५० बिबटे वनतारा वन्यजीव केंद्रात पाठवण्याची योजना आहे. यात पहिल्या टप्प्यात सुमारे २० बिबट्यांचे स्थलांतर अपेक्षित आहे, सुरुवातीच्या स्थलांतराचा आढावा घेतल्यानंतर नंतर अतिरिक्त स्थलांतराचे नियोजन जाणार आहे.
 

leke 
बिबट्यांच्या संवर्धन प्रयत्नांना बळकटी
मुख्यत: काही भागात वाढत्या मानव-बिबट्या संवादाशी संबंधित चिंता दूर करताना, वन विभागाने leopard attacks वाघ आणि बिबट्यांच्या संवर्धन प्रयत्नांना बळकटी देण्याचा निर्णय घेतला आहे. जामनगर रिलायन्स फाउंडेशनच्या वनतारा वन्यजीव बचाव आणि संवर्धन केंद्रात बिबटे पाठवण्याची योजना आखण्यात आली आहे. वनमंत्री गणेश नाईक यांनी अलीकडेच त्यांच्या हँडलवर पोस्ट केले आहे की काही पकडलेल्या बिबट्यांना जामनगरमधील वनतारा वन्यजीव केंद्रात हलवले जाईल.
स्थलांतराची वेळ लवकरच ठरणार
leopard attacks आकाश अंबानी यांच्या वनतारा प्रकल्पातील ग्रीन्स झुओलॉजिकल रेस्क्यू अँड रिहॅबिलिएशन सेंटर येथे हे प्राणी आयात करण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने वाघ, बिबटे, सिंह यांसह भारतात आढळणार्‍या वन्य प्रजातींबरोबरच अनेक प्रजातींचे प्राणी, आणण्यात आले आहेत. या प्राण्यांमध्ये अनेक दुर्मीळ प्रजातींचाही समावेश आहे. वन विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार बिबट्यांच्या स्थलांतराची वेळ आणि पद्धतींबद्दल वन विभागाकडून लवकरच निर्णय घेतल्या जाणार आहे.
Powered By Sangraha 9.0