महिला दिनानिमित्त मोफत महाआरोग्य शिबिर सप्ताह

08 Mar 2026 19:38:05
उमरखेड,
Mahaarogya camp जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उमरखेड येथील प्रभा हॉस्पिटल, देवी रोड येथे महिलांसाठी गरजू रुग्णांसाठी मोफत महाआरोग्य तपासणी व उपचार शिबिर सप्ताह आयोजित आला आहे. हे शिबिर ६ मार्च ते १२ मार्च या कालावधीत सुरू आहे. परिसरातील महिलांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन प्रभा हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रफुल भानेगावकर यांनी केले आहे.
 
 
doc
 
Mahaarogya camp  या महाआरोग्य शिबिर उमरखेडमध्ये नव्याने सुरू झालेल्या प्रभा हॉस्पिटलच्या वतीने डॉ. प्रफुल चंद्रकांत भानेगावकर (अस्थिविकार तज्ञ) व डॉ. गौरी प्रफुल भानेगावकर केअर मेडिसिन, भूलतज्ञ व जनरल फिजिशियन) यांच्या मार्गदर्शनात हा विशेष आरोग्य सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. संपूर्ण आठवडाभर महिलांसाठी मोफत तपासणीसह विविध तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. या शिबिरात स्त्रीरोग निदान, वंध्यत्व तपासणी व मार्गदर्शन, गर्भवती महिलांची तपासणी, तरुण मुलींच्या आरोग्य समस्या, पाळी बंद झालेल्या महिलांचे आरोग्य, गर्भाशयासंबंधित हार्मोनल असंतुलन या समस्यांवर तज्ञांचे मार्गदर्शन मिळेल. शिबिरासाठी नोंदणी मोफत असून महिलांनी जुन्या वैद्यकीय फाईल व रिपोर्ट सोबत आणावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0